पाटोद्यात कॉंग्रेस राष्ट्रवादीने केला चक्का जाम.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा — दि/21/6/2018 गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय यांनी हरभरा खरेदी सुरु करा किंवा अनुदान दया, शेतकर्यांच्या मालाला भाव दया,शेतकर्यांच्या दुधाला भाव ,बोडअळी ग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पैसे वाटप करा.अश्या अनेक प्रश्नावर छत्रपती शिवाजी महाराज चौक पाटोदा येथे रस्तारोको आंदोलन चक्काजाम केले या रास्ता रोकोमुळे तब्बल दोन तास वाहतूक पूर्णपणे बंद होती यावेळी तहसीलदार पाटोदा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी चे महेंद्र गर्जे,काँग्रेसचे जुबेर चाऊस,शेकापचे विष्णुपंत घोलप,गुलाबराव घुमरे,बबनराव भोसले,शिवाजीराव कोकाटे, दादाराव घुमरे,शिवाजी सुरवसे,दादाराव बागर,बालासाहेब कवडे,राहुल शाहुराव जाधव,उमर चाऊस,गणेश भोसले,किशोर उपदेशी,दिलीप रंधवे,,गणेश सानप सह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती