Home » महाराष्ट्र माझा » आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हा – फरके.

आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हा – फरके.

आत्मक्लेश आंदोलनात सहभागी व्हा – फरके.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
— 70/30 वैद्यकिय आरक्षण प्रश्‍नी.

माजलगाव – 70/30 वैद्यकिय शिक्षणातील आरक्षण प्रश्‍नी मराठवाडयातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थी ही वैद्यकिय शिक्षणापासून वंचित राहत असून प्रादेशिक समतोल राखण्यासाठी शासनाने वैद्यकिय शिक्षणातील आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी औरंगाबाद  येथील पैठण गेट समोरील स्वातंत्र्यसेननी गोविंदभाई श्रॉफ यांच्या स्मारकासमोर  सोमवारी आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यार्थी नेते मनोज फरके यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, वैद्यकिय क्षेत्रात करीअर घडवण्याची इच्छा असतांना मराठवाडयातील गुणवंत व पात्र विद्यार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यात राज्याच्या तुलनेत वैद्यकिय शिक्षणासाठी महाविद्यालयाची संख्या नगण्य आहे. त्यामुळे इतर प्रादेशिक विभागात प्रवेश विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. मात्र त्या ठिकाणी चांगले गुण घेवून ही 70/30 च्या वैद्यकिय आरक्षणामुळे वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे एक प्रकारे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. परिणामी प्रादेशिक वाद निर्माण होत असल्याने 70/30 चे आरक्षण रद्द करून सर्व ठिकाणी गुणवत्तेवर वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या औरंगाबाद येथील स्मारकासमोर सोमवार दि.25 रोजी सकाळी 11.00 वा. आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनामध्ये मराठवाड्यातील विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होवून आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडावी असे आवाहन विद्यार्थी नेते मनोज फरके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.