सर्व सभासद,बंधू -भगिनींना आवाहन -एस.एम.
डोंगरचा राजा / आँनलाईन
मराठी पत्रकार परिषद,
सर्व सभासद बंधु-भगिनी
नमस्कार.
मित्रांनो,
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने येत्या रविवारी पाटण येथे परिषदेशी संलग्न तालुका अध्यक्ष आणि पदाधिकार्यांचा भव्य मेळावा होत आहे.महाराष्ट्रात विस्तारलेल्या 354 तालुक्यातील बहुतेक तालुक्यांचे पदाधिकारी या मेळाव्यास येत आहेत.ग्रामीण पत्रकारांसाठीचा हा मेळावा असल्यानं तो ग्रामीण भागातच व्हावा या हेतूनं पाटणची निवड केलेली आहे.पाहुणे ठरायला उशिर झाल्यानं पत्रिका तयार करायलाही विलंब झाला.त्यामुळं व्यक्तीशः पत्रिका पाठविणे जमले नाही.त्यामुळं पत्रकारांच्या ग्रुपवर पत्रिका पोस्ट केल्या गेलेल्या आहेत.हा आपला घरचा कार्यक्रम असल्यानं कोणी पत्रिकेचा आग्रह धऱण्याचं कारण नाही.या निवेदनाव्दारे सर्वांना विनंती आहे की,मोठ्या संख्येनं आपण यायचंय,आणि आपली शक्ती दाखवायची आहे.अनेक विषयांवर मला आपल्याशी बोलायचंय,आपल्याशी चर्चा करून काही ठोस निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत.तेव्हा आपण या..आपली वाट बघतोय..तेव्हा भेटू यात 24 तारखेला …पाटणमध्ये…
एकच.पावसाळा आहे..आजपासून पाऊस सुरू झाला आहे..येताना छत्री,रेनकोट,आगाऊ कपडे घेऊन यावे..त्यामुळं गैरसोय होणार नाही..धन्यवाद
आपला
एस.एम.