ना.मुंडे,खा.मुंडे भगिनींनी दिल्या ईदच्या शुभेच्छा.
डोंगरचा राजा / आँनलाईन
परळी दि. २१ —— राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आणि खासदार डाॅ प्रितमताई मुंडे यांनी आज परळी व बीड शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरी जावून त्यांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या.
ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे हया आज बीड दौ-यावर होत्या, जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठक संपल्यानंतर त्यांनी भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष सलीम जहांगीर तसेच फारूक शेख यांच्या निवासस्थानी भेट दिली व ईदनिमित्त सर्व मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. जहांगीर यांच्या निवासस्थानी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतंर्गत लाभार्थ्यांना गॅस शेगडीचे वाटप त्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
परळी येथे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते खालेदराज, जमील टेलर व शमशोद्दीन खतीब यांच्या निवासस्थानी देखील संध्याकाळी भेट देवून ना.पंकजाताई मुंडे व खा डाॅ प्रितमताई मुंडे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लिम बांधव तसेच महिलांनी मुंडे भगिनींचे जोरदार स्वागत केले. भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, ज्येष्ठ नेते विकासराव डूबे, विनोद सामत, नगरसेवक पवन मुंडे, उमेश खाडे, महादेव इटके, गणेश होळंबे, पवन फुटके, विजयकुमार खोसे आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
••••