Home » राजकारण » मुख्यमंत्र्यांनी केले ना.मुंडे आ.धसचे अभिनंदन.

मुख्यमंत्र्यांनी केले ना.मुंडे आ.धसचे अभिनंदन.

मुख्यमंत्र्यांनी केले ना.मुंडे आ.धसचे अभिनंदन.
डोंगरचा राजा / आँनलाईन

– स्थानिक स्वराज्य संस्थेतील विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले ना. पंकजाताई मुंडे यांचे अभिनंदन.

मुंबई दि. २० —– बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील अभूतपूर्व विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे व नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री फडणवीस परदेश दौरा करून परत आल्यानंतर ना. पंकजाताई मुंडे व आ. सुरेश धस यांनी आज संध्याकाळी वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली व आभार मानले. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांना पराभवाचा धक्का देत भाजपला ऐतिहासिक विजय प्राप्त करून दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी यावेळी ना. पंकजाताई मुंडे यांचे विशेष अभिनंदन केले. नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी देखील यावेळी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून आभार मानले.
••••

Leave a Reply

Your email address will not be published.