Home » माझा बीड जिल्हा » बीड आगाराने मनमानीपणाचा कळस गाठला.

बीड आगाराने मनमानीपणाचा कळस गाठला.

बीड आगाराने मनमानीपणाचा कळस गाठला.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– पवारांचा चुकिचाअहवाल .
– बससेवा अद्यापही बंदच..
कवडगाव बु – बहुजन हिताय,बहुजन सुखाय हे राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीदवाक्य बीड आगाराने चक्क बासनात गुंडाळले आहे वडवणी तालुक्यातील कवडगाव बु येथील बससेवा पुर्ववत सुरु करणेबाबत येथील सरपंच संदिपानराव खळगे व उपसरपंच मकसुदखान पठाण यांनी गेल्या महिनाभरापुर्वी बीड आगाराचे विभाग नियंत्रक जगतकर यांना लेखी निवेदन दिले होते त्यावरुन बीड आगाराच्या रस्ता पाहणी पथकाने पाहणीही केली यापाहणीदरम्यान केवळ ६०० मीटर रस्ता खराबचा अहवाल पथकातील पवार यांनी दिल्यामुळे कवडगावची कुठलीही बससेवा अद्यापही सुरु होऊ शकली नाही त्यामुळे प्रवाशी जनतेत संताप व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे बीड ते कवडगाव मार्गे वडवणी यामार्गावर कुठलीही अडचण नसतानाही बससेवा आद्याप चालु नाही याबाबत अधिक माहिती अशी कि वडवणी तालुक्यातील कवडगाव बु हे गाव ५हजार लोकसंख्येचे गाव असुन या गावास गेल्या ५वर्षापासुन बससेवा सुरु नाही ही शरमेची बाब आहे एस.टी.महामंडळएकिकडे गाव तिथे एस टी हे धोरण राबवते मोठा गाजावाजा केला जातो कृती मात्र शुन्य बीड आगाराने तर ईतका गलथान कारभाराचा कळस गाठला आहे कि ते स्वतःला हिटलर समजु लागले आहेत गेल्या महिनाभरापासुन एस.टी ची मागणी होऊनही बीड आगार अद्यापही झोपेत आहे या बाबत आमच्या प्रतिनिधीने विभाग नियंत्रक जगतकर यांना संपर्क केला असता लवकरच बस सुरु करु असे सांगितले सद्यस्थित शेतकरी विद्यार्थी त्रस्त आहेत वाहतुकिची सुविधा नसल्याने या भागातिल जनता अवैध वाहनातुन प्रवास करत आहेत या गावास या पुर्वी बीडते कवडगाव मार्गे वडवणी,बीड ते कवडगाव मार्गे नाथापुर,बीड ते कवडगाव मार्गे पिंपळादेवी,गेवराई ते कवडगाव मार्गे नाथापुर माजलगाव ते कवडगाव ,धारुर ते कवडगाव अशा प्रकारच्या बसेस चालु होत्या मात्र गेल्या ५वर्षापासुन या ना त्या कारणांमुळे बससेवा बंद करण्यात आल्या एस टी पथकातील पवार यांनी कवडगाव ते नाथापुर दरम्यान केवळ६००मिटर रस्ता खराब असल्याचा अहवाल दिला हा रस्ता दुसर्याच दिवशी पक्का व मजबुत करण्यात आला तरीही बससेवा सुरु झाली नाही तसेच बीड ते कवडगाव मार्गे वडवणी ही बस सुरु करण्यास आडचण काय हा प्रश्न सर्व प्रवाशांना पडत आहे या भागातील सर्व रस्ते डांबरी झालेले आहेत त्यामुळे याभागातुन एस.टीचे उत्पन्न वाढण्यासाठी धारुर ते वडवणी कवडगाव नाथापुर वाहेगाव भेंडटाकळी जातेगाव शिरसदेवी गढीमार्गे गेवराई ही बससेवा जोरात चालु शकते मात्र एस.टी महामंडळाने याची दखल घेतली पाहिजे आज ५००लोकवस्तीच्या गावात बस चालु आहे मात्र कवडगाव भागातील बसेस चालु होत नाहीत ही शरमेची बाब आहे एस टी तील अधिकारी व कर्मचारी यांच्या अशा बेबंधशाहीच्या विरोधात जनतेत संतापाची लाट ऊसळली आहे येत्या२दिवसात बससेवा सुरू करण्यात यावी अन्यथा एस टी महामंडळाच्या विरोधात जनआंदोलन उभारले जाईल असा खणखणीत ईशारा देण्यात आला आहे

Leave a Reply

Your email address will not be published.