Home » माझी वडवणी » मोटार सायकलचा अपघात १ ठार; ३ गंभीर.

मोटार सायकलचा अपघात १ ठार; ३ गंभीर.

मोटार सायकलचा अपघात एक ठार;दोन मुलींसह एक गंभीर.
डोंगरचा राजा / आँनलाईन

▪ माजलगाव तालुक्यातील नित्रुड येथील घटना
दोन मोटार सायकलच्या समोरासमोर धडकेत एका गाडीवरील युवक जागीच ठार झाला तर त्याच्यासोबतच्या दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. दुसऱ्या गाडीवरील व्यक्तीसही गंभीर मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात मंगळवारी दुपारी माजलगाव तालुक्यातील नित्रुडजवळ खामगाव-सांगोला महामार्गावर झाला.

दत्ता रमेश कोळसे (वय २०, रा. लोणगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी नित्रुड जवळील शेतातून मोटारसायकलवरून (एमएच ४४ जे ६९८) दोन भाच्यांना घेऊन गावाकडे निघाला होता. ते नित्रुडवरून जाणाऱ्या खामगाव-सांगोला या महामार्गावर आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलस्वाराने (एमएच ४४ के १८५८) त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दत्ता कोळसे याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्या भाच्या भक्ती दिनकर डाके (वय ४) व सुजाता रमेश मायकर (वय ८) या गंभीर जखमी झाल्या. तर तेलगावून आलेला दुसरा मोटरसायकलस्वार रमेश गोरख उमाप (वय ३४, रा. डिघोळ आंबा, ता. केज) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी लहान मुलींना तात्काळ बीड येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रमेश उमाप यांना माजलगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे समजते.
========================

Leave a Reply

Your email address will not be published.