Home » माझा बीड जिल्हा » नाभिक समाजाची कार्यकारिणी जाहीर.

नाभिक समाजाची कार्यकारिणी जाहीर.

नाभिक समाजाची कार्यकारिणी जाहीर.
अमोल जोशी / डोंगरचा राजा
पाटोदा नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी लढणारी,समाजाच्या विकासासाठी सतत अग्रेसर असणारी नाभिक समाजाची आद्य व तितकीच नावाजलेली महाराष्ट्र नाभिक महामंडळ या संघटनेच्या बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी तांबाराजुरी येथील प्रा सोमीनाथ खंडागळे यांची नियुक्ती करण्यात आली.
महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याणजी दळे यांच्या आदेशानुसार पाटोदा येथे संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मराठवाडा विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बीड जिल्हाध्यक्ष गुलाबभाऊ चव्हाण, युवक मराठवाडा विभागीय अध्यक्ष अविनाश कदम,युवक जिल्हाध्यक्ष किशोर शिंदे,जिल्हा उपाध्यक्ष रमेश राऊत,जिल्हा संघटक राजु आतकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेची बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात नाभिक समाजाचे आराध्य दैवत वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच दीपप्रज्वलनाने झाली.
यानंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा पाटोदा नाभिक समाजबांधवाकडून यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
यांत बीड जिल्हा कार्याध्यक्ष पदी प्रा.सोमीनाथ खंडागळे, आष्टी मतदारसंघ अध्यक्षपदी बाप्पा खामकर, युवक जिल्हाउपाध्यक्ष पदी नामदेव काशिद,पाटोदा तालुकाध्यक्ष पदी जितेंद्र सांगळे,पाटोदा युवक तालुकाध्यक्ष पदी नितीन दुधाळ यांना विभागीय अध्यक्ष युवराज शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा खंडागळे यांनी केले
यानंतर बीड जिल्हाध्यक्ष गुलाबराव चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
ते म्हणाले नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे खंबीर पणे उभा राहील.
यानंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्न करत राहण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.यानंतर अविनाश कदम, किशोर शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपस्थितांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
महाराजांच्या मंदिर उभारण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
ते म्हणाले, समाज संघटन ही काळाची गरज आहे.
समाजाच्या न्याय्य हक्कासाठी समाजाने एकत्र यायला हवे.
नवनिर्वाचित जिल्हा कार्याध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांचे यावेळी त्यांनी तोंडभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन दुधाळ यांनी तर आभारप्रदर्शन सचिन खंडागळे यांनी केले.
या कार्यक्रमास सचिन दळवी,कैलास काशिद,अमोल पोपळे, दीपक खामकर, गणेश सरडे, भागवत दळवी,अमोल क्षीरसागर, सचिन खंडागळे,दादासाहेब गायके,जालिंदर दुधाळ,नितीन दळवी,आण्णा खामकर,बाप्पा खामकर,अभिमान गायके,नितीन दुधाळ,नानासाहेब खंडागळे,बाबु खामकर,गणेश दुधाळ,गणेश दळवी,बाबुराव दुधाळ,अनिकेत गायके,यांसह नाभिक समाजबांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.