Home » माझा बीड जिल्हा » रिपाइंच्या आक्रोश मोर्चाला क्रांतिगुरू..

रिपाइंच्या आक्रोश मोर्चाला क्रांतिगुरू..

रिपाइंच्या आक्रोश मोर्चाला क्रांतिगुरू..
डोंगरचा राजा / आँनलाईन

– लहूजी साळवे विकास परिषदेचा पाठिंबा

बीड – भिमा कोरेगाव दंगलीचा मुख्य सुत्रधार संभाजी भिडेला अटक करण्यात यावी तसेच अ‍ॅस्ट्रॉसिटी कायद्यात कसलाच फेरबदल करण्यात येवू नये. कसत असलेल्या गायरान जमिनी नावे करण्याच्या विरोधात काढण्यात आलेला शासन निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा. या मागण्यांसह विविध मागण्यांसाठी जिल्हा रिपाइंच्या वतीने बीड येथे शुक्रवार (दि.29) जून रोजी आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चाला क्रांतिगुरू लहूजी साळवे विकास परिषदेने पाठिंबा दिला आहे.

युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांना दिलेल्या पाठिंबा पत्रातात क्रांतिगुरू लहूजी साळवे विकास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, आजघडीला संविधानिक हक्कावर गदा येवू लागली आहे. प्रत्येक क्षेत्राचे खासगीकरण होत आहे. त्यामुळे आरक्षणाला धक्का बसू लागला आहे. या पुरोगामित्वाच्या महाराष्ट्रात सनातनी विचारधारेचे लोक आंबेडकरी विचारधारेच्या समुहावर हल्ले करू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर जवळील वाकडी या गावी विहिरीत पोहण्याच्या कारणावरू जातीय द्वेषातून गावगुंडांकडून सचिन चांदणे, राहूल चांदणे यांना पट्याने व लाकडी दांड्याने बेदम मारहाण करून त्यांची गावभर नग्न धिंड काढण्यात आली आहे. उदगीर तालुक्यातील मातंग कुटुंबीय लग्नानिमित्त मारूती मंदिरावर दर्शनासाठी गेले असताना नवरदेवासह निरपराध स्त्री यांना दर्शनास मज्जाव करीत गावगुंडांकडून बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे समाजाचे वातावरण भयभित झाले आहे. पुरोगामी महाराष्ट्रात ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर आंबेडकरी चळवळींचे मोठे नुकसान होणार आहे.

संविधानिक हक्क आणि अन्याय-अत्याचारांच्या विरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी रिपाइंच्या वतीने बीड येथे काढण्यात येणार्‍या आक्रोश मोर्चाला क्रांतिगुरू लहूजी साळवे विकास परिषदेचा पुर्णपणे पाठिंबा आहे. असे मोर्चाचे आयोजक तथा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पु कागदे यांना दिलेल्या पाठिंबा पत्रात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय चांगणे यांच्यासह स्वप्नील हतागळे, सचिन चांदणे, सनी चांदणे, दिनेश जाधव, बाबासाहेब चांदणे, अमोल खळे, अजय दळवी, जय चांदणे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.