..तर गुटखा माफिया हत्या करायला मागे-पुढे पाहणार नाहीत – धनंजय मुंडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
राज्यात गुटखा बंदी असली तरी खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. गुटखा बंदीच्या विषयावरुन आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुटखा बंदीबाबत मी मार्च अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला तेंव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचारी यांना धमकी देण्यातआली.आता गुटखा गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत उद्या हे गुटखा माफिया खून करायलाही मागे पडणार नाहीत.
मार्च महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात मी जेव्हा गुटखा बंदीचा संदर्भात प्रश्न उपस्थित केला तेव्हा माझ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना धमक्या मिळाल्या. आता गुटख्याची गाडी सोडावी म्हणून पोलिसांना धमक्या दिल्या जात आहेत. राज्यात गुटखा बंदी असतानाही गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस आणि अधिकाऱ्याला धमकावले जाते. याचा अर्थ राज्यात बंदी असतानाही खुलेआम गुटख्याची विक्री आणि उत्पादन सुरु आहे असे ते म्हणाले.
गुटख्याची गाडी सोडावी यासाठी पोलीस
अधिका-याला धमकावले जाते याचाच अर्थ राज्यात बंदी असतांनाही खुलेआम गुटख्याची विक्री, उत्पादन केले जात आहे. मी या विषयावर सातत्याने आवाज उठवत आहे मात्र सरकार कारवाई करीत नसल्यानेच पोलिसांना धमकी देण्यापर्यंत या माफियांची मजल गेली आहे.
मी सातत्याने हा विषय लावून धरला आहे पण सरकार काहीच करत नसल्याने गुटखा माफियांची पोलिसांना धमकी देण्यातपर्यंत मजल गेली आहे. उद्या हे गुटखा माफिया कोणाचा खून करायलाही मागेपुढे पाहणार नाही असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
.