Home » विशेष लेख » आक्रमक जातीयवाद हा अध्यात्माला घातक — ह.भ.प.रामदासी.

आक्रमक जातीयवाद हा अध्यात्माला घातक — ह.भ.प.रामदासी.

आक्रमक जातीयवाद हा अध्यात्माला घातक — ह.भ.प.रामदासी.
डोंगरचा राजा / आँनलाईन
*माजलगाव — कीर्तन हे लोकजागृतीचे प्रभावी माध्यम आहे. संतानी*
*कीर्तनभक्तीच्या माध्यमांतून समाज एकसंध ठेवण्याचे कार्य* *केले. समाज जीवनात दया, दाक्षिण्य, परोपकार, समता,* *बंधुता, एकता, देशप्रेम इत्यादी जीवनमूल्यांचा विचार* *रूजवला.*
_*कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे..!*_
किंवा
_*नारायण असे विश्वी, त्याची पूजा करीत जावी*_
*हाच उपदेश संतांनी समाजाला सांगितला परंतु आज सर्वच* *क्षेत्रात आक्रमक जातीयवाद बळावत आहे. अध्यात्माच्या* *पवित्र क्षेत्रातही तो बळावत आहे. हाच जातीयवाद*
*अध्यात्माला खूप घातक आहे. या बळावलेल्या* *जातीयवादामुळे एक दिवस भारतीय संस्कृती नष्ट*
*झाल्याशिवाय राहाणार नाही, असे विचार राष्ट्रीय* *कीर्तनकार ह.भ.प.भरतबुवा रामदासी महाराज यांनी व्यक्त* *केले ते परशुराम सेवा संघ माजलगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत*. *या प्रसंगी अध्यक्षस्थानी गजानन जोशी जिल्हा अध्यक्ष बीड हे उपस्थित होते*.
*आज अध्यात्माचा खूप प्रचार प्रसार झाला. महाराष्ट्रातील* *गावागावांत कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह,* *ज्ञानेश्वरी पारायण, भजन, कीर्तन, अन्नदान, भंडारा मोठ्या* *प्रमाणात होत आहे ही चांगली बाब आहे परंतु ज्या संतांचे* *विचार भजन कीर्तनातून मांडले जातात त्याच संतांना* *जातीपुरतेच सिमित केले जात आहे.*
_*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ..!*_
*या तत्वज्ञानाकडे दुर्लक्ष केले जात आहे. अठरा पगड*
*जातीधर्माच्या संतांनी एकाच भगव्या ध्वजाखाली एकत्र* *येवून पंढरीच्या वाळवंटात एकात्मतेचा उद्घोष केला.*
*तो आम्ही विसरणार का…? संतांनी ज्या मानवताधर्माची* *शिकवण दिली, ती आम्ही विसरणार का….? आज सर्व* *कीर्तनकार, प्रवचनकार, समाज प्रबोधनकार यांनी समाज* *एकसंध राहण्यासाठी अथक प्रयत्न केले पाहिजेत.*
*कुठल्याही राजकिय अमिषाला बळी न पडता भारतीय* *संस्कृतीचे जतन केले पाहिजे. जात, पात, पंथ, धर्म यांवरच* *पुन्हा एकदा देशाचे तुकडे होतील, असा गंभीर इशाराही* *ह.भ.प. भरतबुवा रामदासी यांनी दिला. आज संताचे व* *महापुरुषांच्या विचाराचे आचरण करण्यापेक्षा त्यांना* *आपल्याच जातीपुरते सिमित करण्याचा प्रयत्न होत आहे.*
*ही खरी शोकांतिका आहे. ही परिस्थिती फक्त कीर्तनकारच* *बदलु शकतो. म्हणून आज कीर्तन प्रवचनांतून सामाजिक* *मूल्यांचा व नैतिक मूल्यांचाच विचार मांडण्याची नितांत* *गरज आहे, असेही ते म्हणाले. देश, देव आणि धर्म*
*याविषयी प्रेमभाव निर्माण करण्याची नितांत गरज आहे.*
*एकीकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती समाजामध्ये श्रद्धेवरच* *आघात करीत आहे. फेसबुक, व्हाॅट्अॅप्सवर जातीय तेढ* *निर्माण करणारे संदेश सतत फिरत असतात. अशा भयावह* *काळात प्रबोधनकारांवर समाज जीवन एकसंध करण्याची* *मोठी जबाबदारी आहे. काळाची ती नितांत गरज आहे.*
*असेही भरतबुवा रामदासी यांनी सांगितले.*कालीका नगरीत (माजलगाव)या कार्यक्रमास अनेक श्रोते मोठ्या संख्येत उपस्थित होते*.

ह.भ.प. राष्ट्रीय कीर्तनकार भरतबुवा रामदासी (बीड,महाराष्ट्र)
संपर्क – 9421344960.

Leave a Reply

Your email address will not be published.