Home » महाराष्ट्र माझा » शेतकऱ्यांचे ३ कोटी,४२ लाख ऊस बीलापोटी बँकेत जमा – जगताप.

शेतकऱ्यांचे ३ कोटी,४२ लाख ऊस बीलापोटी बँकेत जमा – जगताप.

शेतकऱ्यांचे ३ कोटी,४२ लाख ऊस बीलापोटी बँकेत जमा – जगताप.
डोंगरचा राजा / आँनलाईन

— छत्रपती सहकारी सखार कारखान्याचा ऊस बिलाचा हफ्ता रु २०००/- प्रती मे.टन प्रमाणे बँकेत वर्ग

माजलगाव — सावरगाव येथील छत्रपती कारखाण्याने गळीत हंगाम २०१७ मधील ३०/०३/२०१८ ते ०९/०४/२०१८ कालावधीतील उसाचे पेमेंट बँकेत वर्ग केला आहे. तालुक्यातील तिन्ही कारखान्यापैकी फक्त छत्रपतीने गळीत हंगाम २०१७-१८ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकार्यांना एफ.आर.पी. पेक्षा जास्त दराने पेमेंट केल्यामुळे शेतकार्यामध्ये समाधान व्यक्त होत आहे..

माजलगाव तालुक्यात आज पर्यंत ऊस दराबाबत कित्येक आंदोलने झाली असताना बाकीच्या कारखान्याच्या अगोदर छत्रपतीने सर्व ऊस बिल दिले.माजलगाव तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा गाळप क्षेमता कमी असून व् विविध पदार्थाचे कसलेही प्रकल्प नसताना माजी आमदार बाजीराव भाऊ जगताप संस्थापक चेअरमन असलेल्या सावरगाव येथील छत्रपती सह.साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे हित जपत इतर कारखान्याच्या स्पर्धेत सर्वात अगोदर हंगामातील सर्व बिल एफ.आर.पी. पेक्षा जास्त दिले.

कारखान्याने गळीत हंगामात ३,०१,३७६.७७६ मे.टन उसाचे गाळप केलेले आहे.गाळप केलेल्या ऊस उत्पादक शेतकर्यांच्या ऊस बिलाचा ३०/०३/२०१८ ते ०९/०४/२०१८ या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्याना रु. २०००/- प्रती मे.टन प्रमाने बँकेत वर्ग केला आहे.यात ४९० ऊस पुरवठादार शेतकर्यांचे एकून रुपये तीन कोटी बेचाळीस लाख दोन हजार सातशे अडूसष्ट रुपये बँकेत वर्ग केल्याचे व्हा.चेअरमन मा.मोहनराव जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.