Home » माझी वडवणी » विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.

विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न.
अमोल जोशी / डोंगरचा राजा
पाटोदा येथील ओम कोचिंग क्लासेस व आदर्श मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 10 वी मध्ये प्रथम आलेल्या प्रत्येक शाळेतील पाच विद्यार्थी व त्यांच्या आई-वडिलांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन ओम कोचिंग क्लासेस बस स्टँड समोर पाटोदा येथे करण्यात आले होते. यावेळी भामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव सर,वसंतराव नाईक विद्यालयाचे मुख्याध्यापक तुकाराम तुपे सर,संत तुकाराम महाराज विद्यालयाचे मुख्याध्यापक गवळी गणेश नारायणकर संदीप जाधव नगरसेवक श्रीहरी गिते राजुजाधव यांच्या हस्ते स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले तसेच माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
ओम क्लासेस चे संचालक प्रा.खंडागळे सर,डॉ.नंदकुमार जाधव,अरुण कोठुळे, गोकुळ डिसले यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. नंदकुमार जाधव यांनी केले.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाटोद्यातील दहावीतील प्रत्येक शाळेतील पहिल्या पाच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गुणगौरव सत्कार करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या पालकांचे देखील कौतुक करण्यात आले.
यावेळी तुपे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी रडले नाही पाहिजे, लढले पाहिजे म्हणजे रडल्याने केवळ सहानभूती मिळते आणि लढल्याने यश मिळते. तसेच अलीकडे विद्यार्थ्यांनी आपली स्वप्ने छोटी न ठेवता मोठी स्वप्ने बघितली पाहिजेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जाधव सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, सर्वप्रथम विद्यार्थांनी आपले ध्येय निश्चित करून त्यासाठी योग्य तो मार्ग निवडला पाहिजे.
याचबरोबर आपला परिसर निसर्गरम्य पर्यावर्णात राहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एकतरी झाड लावले पाहिजे असे देखील जाधव सर यांनी यावेळी आवाहन केले.

यावेळी पाटोदा येथील वसंतराव नाईक विद्यालय, भामेश्वर विद्यालय,प्रियदर्शनी कन्या विद्यालय, संत तुकाराम महाराज विद्यालय, लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कुल इत्यादी शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत पालकांचादेखील गुणगौरव करण्यात आला.
यासमयी विद्यार्थी गुणगौरव सोहळा कार्यक्रमाला मयूर जाधव,ढाकणे सर,मोहळकर, पत्रकार महेश बेदरे प्रदीप मांजरे नजान सर,ताहीर भाई,नागरगोजे सर,खंडागळे सर,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आण्णासाहेब खंडागळे सरांनी केले तर कार्यक्रमाच्या शेवटी आभार सोमीनाथ खंडागळे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.