Home » माझा बीड जिल्हा » रोटरी चे नववे नेत्र-शिबिर संपन्न.

रोटरी चे नववे नेत्र-शिबिर संपन्न.

रोटरी चे नववे नेत्र-शिबिर संपन्न.
अमोल जोशी / डोंगरचा राजा
पाटोदा — 17 जुन रोजी पाटोदा येथील आनंद क्लॉथ सेंटर व आनंद हॉस्पिटल नगर यांच्या संयुक्त विद्यमाने ,रोटरी क्लब पाटोदा आयोजित नेत्र शबीराचे आयोजन नगरपंचायत कार्यलय जवळ असलेल्या रोटरी क्लब कार्यालय येथे करण्यात आले होते.
आज या शिबिरात एकूण 125 नेत्र रुग्णाची तपासणी करण्यात आली तर शस्त्रक्रियेसाठी 36 रुग्ण आनंद हॉस्पिटल नगर येथे पाठविण्यात आले .
आत्तापर्यंत झालेल्या नऊ नेत्र शिबिरात जवळपास दीड हजार नेत्र रुग्णाची तपासणी करण्यात आली आहे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येते या शिबिरामुळे गोरगरीब गरजू रुग्नाना मोठा आधार मिळत आहे
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी  आनंद हॉस्पिटल नगरहुन किरण कवडे,सुशील गाडेकर यांच्या टीमने काम पाहिले तर पाटोदा  रोटरी चे अध्यक्ष वसंतलाल गुगळे,कु.सुरेखा खेडकर,शिवाजी घरत,महादेव सुरवसे प्रशांत देशमुख,संजय राख,अतुल शिंदे, म.द.क्षीरसागर यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published.