Home » माझा बीड जिल्हा » जयभवानी एफआरपी प्रमाणे पेमेंट करणार – पंडीत.

जयभवानी एफआरपी प्रमाणे पेमेंट करणार – पंडीत.

जयभवानी एफआरपी प्रमाणे पेमेंट करणार – पंडीत.
डोंगरचा राजा / आँनलाईन
साखरेच्या दरात झालेली निच्चांकी घट, मालतारण कर्ज मिळण्यास आलेल्या राजकीय अडचणीमुळे तसेच केन्द्र सरकारच्या शेती विषयक नकारात्मक धोरणामुळे राज्यभरात साखर उद्योगावर निर्माण झालेले संकट यासह इतर कारणांमुळे “जयभवानी” कडुन ऊसाचे पेमेंट वाटपास विलंब झाला. अशा प्रतिकुल परिस्थितही शेतकर्‍यांच्या हितासाठी “जयभवानी” ने पंधराशे रुपये प्रमाणे ऊसाचा पहिला हप्ता वाटप करण्यास सुरुवात केली आहे. मात्र आमचे राजकीय विरोधक ऊस उत्पादक शेतकर्‍यांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत असो. “जयभवानी” कारखाना शेतकर्‍यांना एफआरपी प्रमाणे भाव देणार असुन लवकरच उर्वरित पेमेंट सुद्धा वाटप करण्यात येईल याची मी ग्वाही देतो.

चार वर्ष बंद असलेला “जयभवानी” कारखाना अतिशय प्रतिकुल परिस्थितीत पुन्हा सुरु केला आहे, गाळप हंगामाच्या सुरुवातीला कारखान्याने दोन हजार रुपये प्रतिटना प्रमाणे ऊसाचे पेमेंट केले. मात्र हंगाम सुरु होतांनाचे साखरेचे छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचे दर चोविसशे रुपयांवर येवुन ठेपल्यामुळे पुढे ऊसाला भाव देणे शक्य झाले नाही. राज्यभरात हीच परिस्थिती निर्माण झाल्याने सुमारे १३२ कारखान्यांच्या विरोधात साखर संचालकांनी कारवाई केली होती. ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा दबाव वाढल्याने अखेर केंद्र शासनाने साखरेचे दर निश्चित केले, असे असले तरीही साखर विक्रीवर शासनाने निर्बंध आणल्यामुळे “जयभवानी” ला महिण्याकाठी केवळ १८ हजार क्विंटल साखर विकण्याची परवानगी दिली आहे. माल तारण कर्ज नसल्या कारणाने “जयभवानी” ला या बंधनातून मुक्त करून लवकरात लवकर साखर विकण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम देण्यासाठी सोयीचे होईल असे विनंती पत्र केंद्र सरकारला दिले आहे. ऊसाचे पेमेंट करतांना अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी हैराण झालेला आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही “जयभवानी” सहकारी साखर कारखान्याने शेतकर्‍यांना पेरणीच्या तोंडावर पैसा मिळावा म्हणुन पंधराशे रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.