Home » माझा बीड जिल्हा » पत्रकारांचा वृक्षारोपन संकल्प कौतुकास्पद-जी.श्रीधर.

पत्रकारांचा वृक्षारोपन संकल्प कौतुकास्पद-जी.श्रीधर.

पत्रकारांचा वृक्षारोपन संकल्प कौतुकास्पद-जी.श्रीधर.
डोंगरचा राजा / आँनलाईन

देवडीत वृक्षारोपन व जिल्हा पत्रकार संघाचा सत्कार

बीड दि.१६ (प्रतिनिधी): आजकाल तरूण मुल ग्रामीण भागातून शहरी भागाकडे जातात. मात्र अनेक वर्ष शहरी भागात राहूनही पुन्हा आपल्या मातीशी नाळ कायम असलेल्या एस.एम.देशमुखांनी गावात येऊन आपल्या शेतात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला. ही बाब खरोखरच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी वडवणी तालुक्यातील देवडी येथे देशमुख फार्मवर वृक्षारोपन व पत्रकार सत्कार कार्यक्रमात बोलताना केले.

दि.१६ जून रोजी देवडी येथे जिल्हा पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपन शुभारंभ व पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वनविभागाचे अधिकारी मुंडे, रानडे,सरपंच जालिंदर झाटे, जेष्ठ पत्रकार विश्‍वनाथ माणुसमारे,राम कुलकर्णी, संपादक सर्वोत्तम गावरस्कर, संपादक नरेंद्र कांकरीया, संपादक राजेंद्र आगवान, पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस अनिल महाजन, अधिस्विकृती समितीचे सदस्य अनिल वाघमारे आदींची उपस्थिती होती.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विशस्त एस.एम.देशमुख यांनी जी.श्रीधर यांना शाल,श्रीफळ,बाळशास्त्री जांभेकरांची पत्रिका, फेटा बांधून स्वागत केले.

यावेळी प्रास्ताविकात एस.एम.देशमुख यांनी वर्षभरात एक हजार झाडे लावण्याचा संकल्प केला.त्यापैकी शनिवारी २५० झाडे लावण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी गावातील शेतकर्‍यांना वृक्ष लागवड करण्यासाठी प्रोसाहीत करून रोप वाटप करण्यात आले. यावेळी गावातील जेष्ठ शेतकरी तुळशीराम राऊत, गोरख पैठणे, बाबासाहेब झाटे यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना जी.श्रीधर म्हणाले की, एस.एम.देशमुखांचा नावलौकीक मोठा आहे. मात्र आमची भेट प्रथमच झाली. वृक्षारोपन कार्यक्रम होणार असे ऐकल्यानंतर मी आवर्जुन या कार्यक्रमाला उपस्थित राहीलो. बीड जिल्ह्याबद्दल बाहेर फारसे चांगले बोलले जात नाही. मात्र जिल्ह्यातील लोक प्रेमळ आहेत. माझा गेल्या दीड वर्षाचा अनुभव अत्यंत चांगला असल्याचे जी.श्रीधर यांनी सांगितले. यावेेळी वन अधिकारी मुंडे यांनी आपल्या खात्याच्या योजनांबद्दल माहिती दिली. शाहीर यांनी शेतीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तर राम कुलकर्णी यांनी शेती विषयी विदारक स्थिती विषद केली. या कार्यक्रमाला पत्रकार परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल साळुंके, जिल्हा सरचिटणीस विलास डोळसे, रवि उबाळे, लक्ष्मण नरनाळे, मंगेश निटूरकर, कल्याण कुलकर्णी, दत्ता अंबेकर, जानकीराम उजगरे, प्रा.एस.पी.कुलकर्णी, रघुनाथ जावळे, संतोेष स्वामी, सुर्यकांत बडे, अविनाश मजमुले,बाबुराव जेधे,शेख ताहेर, विनोद जोशी आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.