Home » माझी वडवणी » सरपंच संघटनेच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी संजय आंधळे यांची निवड

सरपंच संघटनेच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी संजय आंधळे यांची निवड

सरपंच संघटनेच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी संजय आंधळे यांची निवड
———————————————————
डोंगरचा राजा / आँनलाईन
महाराष्ट्र राज्य स्तरावर कार्यरत असणाऱ्या मराठवाडा सरपंच – उपसरपंच संघटनेच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी सरपंच संजय आंधळे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहिर करण्यात आली असुन त्यांना संघटनेच्या वतीने नियुक्ती पत्र देण्यात आले.सरपंच संजय आंधळे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे विविध स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य स्तरावर शामराव पडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या मराठवाडा सरपंच – उपसरपंच संघटनेचे राज्य अध्यक्ष अविनाश पुजारी यांनी नुकतीच एक व्यापक बैठक घेऊन संघटनेच्या वडवणी तालुका अध्यक्षपदी सरपंच संजय आंधळे यांची नियुक्ती पत्र देऊन सर्वानुमते निवड जाहिर करण्यात आली.सरपंच संजय आंधळे यांची निवड जाहिर होताच संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार ही करण्यात आला.
यावेळी महादेव रेडे सरपंच देवळा ,शिवाजीराव मुंडे सरपंच चिंचाळा, पोपट शेंडगे सरपंच तिगांव,जालींदर झाटे सरपंच देवडी,ईश्वर नाईकवाडे सरपंच हिवरगव्हाण,रामेश्वर कांबळे सरपंच चिंचवडगांव, अरुण आवाड सरपंच दुकडेगांव,शेख खाजाभाई सरपंच पिंपळा, गंगाधर भारती सरपंच सोन्नाखोट्टा ,सुधाकर मुंडे सरपंच कोठारबन,अनिल चोले उपसरपंच खडकी,सतिष बडे उपसरपंच दुकडेगांव,
बाळासाहेब डोंगरे उपसरपंच देवळा,इत्यादींची उपस्थिती होती तर अनिल लंगडे सरपंच खापरवाडी, रामेश्वर जाधव सरपंच साळींबा, बद्रीनाथ व्हरकटे सरपंच ढोरवाडी, आश्रुबा सरक सरपंच कान्हापुर,
महादेव शेंडगे सरपंच परडी माटेगांव,बाळासाहेब राऊत सरपंच काडीवडगांव, परमेश्वर राठोड सरपंच ह.पिंपरी,सुनंदा सौंदरमल सरपंच उपळी,दादाराव तौर सरपंच मोरेवाडी यांची या सर्वांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सरपंच संजय आंधळे यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.