पावनधाम येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.
डोंगरचा राजा / आँनलाईन
— संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे विद्यार्थी परमार्थ आणि शालार्थ मध्ये अव्वल.
केज — तालुक्यातील संत तुकोबाराय पावनधाम संस्थान,औरंगपूर येथील ब्रम्हेश भानूदास लिमन 90.20% आणि
आकाश दत्तात्र्य लिमन 82.40% टक्के घेवून घवघवीत यश संपादन केल्याने संत तुकोबाराय संस्थानचे संसाथापक अध्यक्ष गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
त्या अनुषंगाने दि.10 जून रोजी सकाळी दहा वाजता संत तुकाराम महाराज मंदिरात सत्काराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, संत तुकोबाराय पावनधाम संस्थान हे संस्कार केंद्र आहेच त्याच बरोबर याठिकाणी उद्याच्या भारताचे आधारस्तंभ घडवण्याचे काम निष्ठेने करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर व अध्यक्ष गुरूवर्य महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल ,श्रीफळ आणि पुष्पहार देवून गौरव करण्यात आला. याप्रसंगी अमोल महाराज, अशोक महाराज, जनार्धन महाराज, शाम महाराज भिसे,मुळे महाराज, गणपत पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.