Home » देश-विदेश » ना.मुंडेंनी घेतले महाराजांचे अंत्यदर्शन.

ना.मुंडेंनी घेतले महाराजांचे अंत्यदर्शन.

ना.मुंडेंनी घेतले महाराजांचे अंत्यदर्शन.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– भय्यू महाराजांना उद्या गोपीनाथ गडावर  सर्वपक्षीय श्रध्दांजली

मुंबई —– राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे आज सकाळी इंदोर येथे जावून राष्ट्रसंत भय्यू महाराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, त्यांच्या सूचनेनुसार उद्या गोपीनाथ गडावर  भय्यू महाराजांना  श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे कुटूंबियांशी    भय्यू महाराजांचा कौटूंबिक स्नेह होता. त्यांच्या निधनाने  कुटुंबातील सदस्य गेल्याची तसेच मनाला फार वेदना झाल्याची भावना ना. पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली होती. भय्यू महाराजांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आज सकाळी त्या  मुंबईहून विमानाने इंदूरला रवाना झाल्या. इंदोर येथे पोहोचताच सुर्योदय आश्रमात जाऊन त्यांनी भय्यू महाराजांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आणि भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. महाराजांची कन्या कुहू व त्यांच्या कुटूंबियांचे सांत्वन करून त्यांनी धीर दिला. दुपारी सूर्योदय आश्रमापासून निघालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेतही त्या सहभागी झाल्या होत्या. सयाजी मुक्तीधाम येथे महाराजांवर शोकाकूल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले. देशाच्या कानाकोप-यातून त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

गोपीनाथ गडावर शोकसभा
———————————
दरम्यान, ना. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या सूचनेनुसार  उद्या १४ जून रोजी सकाळी ११ वाजता गोपीनाथ गडावर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले असून यात महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे, यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.