Home » राजकारण » भाजपचे सुरेश धस यांचा दणदणीत विजय.

भाजपचे सुरेश धस यांचा दणदणीत विजय.

भाजपचे सुरेश धस यांचा दणदणीत विजय.
डोंगरचा राजा / आँनलाईन

– ना.पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीपुढे राष्ट्रवादी निष्प्रभ.

– धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका.

बीड – राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या जादूच्या कांडीपुढे राष्ट्रवादी काँग्रेस आज निष्प्रभ ठरली. बीड-लातुर- उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपचे सुरेश धस यांचा दणदणीत विजय झाला. या निकालाने धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे.

बीड-लातुर -उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान झाले होते. भाजपचे सुरेश धस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठींबा अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात ही लढत झाली. तत्पुुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज भरलेले रमेश कराड यांनी अचानक उमेदवारी मागे घेतली त्याच दिवशी भाजपचा विजय निश्चित मानला जात होता. त्यानंतर तब्बल बावीस दिवसांनी आज सकाळी मतमोजणीला सुरूवात झाली. एकुण १००५ मतदारांपैकी १००४ मतदारांनी मतदानात भाग घेतला होता. यापैकी मत मोजणीनंतर सुरेश धस यांना ५२७ तर जगदाळेंना ४५१ मते मिळाली. २५ मते बाद ठरविण्यात आली तर एका मतदाराने नोटासाठी मतदान केले. भाजपचे सुरेश धस यांचा ७६ मतांनी दणदणीत विजय झाला.

*जादूची कांडी प्रभावी ठरली*
———————————-
ही निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्या नेत्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती परंतु त्यांच्या उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्याने चुरस निर्माण झाली होती. या निवडणुकीत ना.पंकजाताई मुंडे यांनी फिरविलेल्या जादूच्या कांडीपुढे राष्ट्रवादी काँग्रेस पुरती निष्प्रभ ठरली. या निकालाने त्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पहावयास मिळाला तर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका बसला.
••••••

Leave a Reply

Your email address will not be published.