Home » ब्रेकिंग न्यूज » गोदावरीत 28 जणांची बोट उलटली..!

गोदावरीत 28 जणांची बोट उलटली..!

गोदावरीत 28 जणांची बोट उलटली..!
डोंगरचा राजा / आँनलाईन
गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर माजलगाव जवळ पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. होडी चालकाने आणि इतरांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदत केल्याने सर्व भाविकांचे प्राण वाचले.

बीड /माजलगाव: अधिक मासानिमित्त देवदर्शनाला जाणाऱ्या 28 भाविकांची बोट उलटल्याची दुर्घटना घडली. गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर माजलगावजवळ पुरुषोत्तमपुरी या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला.

होडी चालकाने आणि इतरांनी प्रसंगावधान राखत वेळीच मदत केल्याने सर्व भाविकांचे प्राण वाचले. बुडालेल्या भाविकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

अधिक मासानिमित्त सध्या पुरुषोत्तमपुरी इथे लाखो भाविकांची गर्दी आहे. पुरुषोत्तमच्या पायथ्यालाच गंगा असल्याने आसपासच्या गावातील भाविक हे बोटीने प्रवास करतात.

काही भाविक आज सकाळी दर्शनासाठी घनसांगवी तालुक्यातील गोळेगावाहून पुरुषोत्तमपुरी येथे येत असताना होडी पलटी झाल्याने होडीतील 28 भाविक गंगेत बुडाले. मात्र होडी चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.

दरम्यान, बोट नेमकी कुणाच्या चुकीमुळे उलटली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.