Home » माझा बीड जिल्हा » शिदेंवाडीचा आदर्श घ्यावा – अँड. देशमुख.

शिदेंवाडीचा आदर्श घ्यावा – अँड. देशमुख.

शिदेंवाडीचा आदर्श घ्यावा – अँड. देशमुख.
डोंगरचा राजा / आँनलाईन

आष्टी — शिदेवाडी गाव नाम फाऊन्डेशन च्या मोफत मिळालेल्या पोकलेन मशिन मुळे पूर्ण उन्हाळ्यात तालुक्यात चर्चेत राहीले. हे मशीन अँड. अजित देशमुख यांनी मिळवून दिले होते. गावातील तेरा बंधाऱ्यातील गाळ काढल्यानंतर मे महिन्यात ३१ तारखेला आलेल्या पावसाने हे बंधारे खचाखच भरले. काल जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले आहे. गावाला जेवढा आनंद झाला तेवढाच आनंद पाण्याचे पूजन करताना मलाही झाला आहे. हा आनंद विकत मिळत नाही. हे तुमच्या आमच्या मेहनतीचे फळ आहे. आपण असाच एकोपा ठेवून आणखी काही विकास साधू. तसेच आसपासच्या गावांनी शिदेवाडीचा आदर्श घेऊन काम करावे, असे आवाहन देशमुख यांनी यावेळी केले.
सिने अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊन्डेशनने टू टेन ही पोकलेन मशीन शिदेवाडीकरांना दिली होती. ही मशीन एक महिना रात्रंदिवस चालू होती. शेतकऱ्यांनी या मशीनला लागणारे डिझेल लोक वर्गणीतून टाकले होते. जवळपास साडेतीन किलोमीटर अंतरात तयार असलेल्या तेरा बंधाऱ्यातील गाळ काढला गेला.
शासनाच्या एक रूपयाचाही लाभ न घेता जनता उभी राहिली की, परिवर्तन कसे होते, हे येथील जनतेने तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला दाखवून दिले आहे. लोकजागृती अतिशय महत्वाची असून राजकारण विरहित काम होत असले की, त्यात जनता समाधानी होते. शिदेवाडी येथील जनता अशा कामाने स्वबळा वर उभी राहील. पाण्याचा पुरेपूर उपयोग घेऊन शेतकऱ्यांनी आता चांगली पिके घेऊन विकास साधावा, असे देशमुख या वेळी म्हणाले.
यावेळी सर्व बंधाऱ्यातील पाण्याची पहाणी करण्यात आली. बंधाऱ्याच्या पाणी अडविणाऱ्या भिंतीजवळ पाच ते दहा फूट माती आणि मुरुमाचा भराव टाकला होता. त्यामुळे कोणत्याही बंधाऱ्यातील पाणी गळत नव्हते. पाण्याची गळती झाली असती तर पाणी वाया गेले असते. मात्र येथील तरुणांनी याचे चांगले नियोजन केल्याने हे शक्य झाले आहे.
यावेळी डॉ. राजेंद्र जरांगे, गोवर्धन मस्के, सचिन काकडे, संजय दरेकर, संजय केरूळकर, बन्सीभाऊ पोकळे, प्रा. अमृत पोकळे, विठ्ठल वालेकर, राम दरेकर, अशोक काकडे, एकनाथ खंडागळे, गणेश खंडागळे, हनुमान पोकळे यांचे सह अन्य हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.