Home » राजकारण » बीड-उस्मानाबाद-लातूर चा निकाल सोमवारी.

बीड-उस्मानाबाद-लातूर चा निकाल सोमवारी.

बीड-उस्मानाबाद-लातूर चा निकाल सोमवारी
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड : न्यायालयीन प्रक्रियेमुळे 24 मेपासून उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर पडली. याच प्रकरणातील निर्णय आता सोमवारी म्हणजे 11 तारखेला लागणार असल्याचं हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितले.

दरम्यान, यापूर्वीच निवडणूक आयोगाने 11 तारखेपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण करा, असे निर्देश दिले होते. असं असताना कोर्टाचा जो काही निर्णय येणार आहे, तोही 11 तारखेला येणार आहे. म्हणून आता ही मतमोजणीची प्रक्रिया 11 तारखेलाच म्हणजे निर्णयानंतर लगेच होणार, की त्यापुढे परत एकदा निवडणूक आयोग आपला प्रोग्राम बदलून देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.