पाटोद्यात शेतकऱ्यांनी केला चक्काजाम.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा येथे रविवारी सकाळी १० वाजल्या
पासून शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले
शिवाजी चौकात सकाळपासूनच शेतकऱयांनी गर्दी केली होती .
खोटी विजबिले माफ करा,पीक कर्ज तात्काळ वाटप करा , शेतकऱ्यांचा हरभरा तात्काळ खरेदी करा,दुधाचे भाव गाय ३० रुपये व म्हैस ५० रुपये करा ,७/१२ ,८अ फेरफार आद्यवात द्या,पीक कर्ज माफ करा अश्या विविध मागण्या करत शेतकऱ्यांनी तब्बल दीड तास रस्ता रोको आंदोलन केले
चक्काजाम आंदोलनास शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख, विष्णुपंत घोलप,महादेव नागरगोजे यांची भाषणे सर्वांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविषयी कडाडून टीका केली चक्काजाम आंदोलनाला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.वाहनांच्या एक किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या ,पाटोदा पोलीस ठाण्याचे पी.आय.माने पी.एस.आय. डोंगरे व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता
प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश जाधव यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले मागच्या दोन दिवसापूर्वीच शेतकऱ्यांनी दूध व् भाजीपाला रस्त्यावर ओतुन आपला संताप व्यक्त केला होता आमच्या मागण्या लवकर पुर्ण कराव्यात अशी मागणी शेतकरी करत आहेत