कु.पुनम प्रथम तर कु.स्नेहल द्वितीय.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन
पाटोदा शहरातील प्रियदर्शनि कन्या प्रशाला शाळेचा यंदाचा दहावीचा निकाल हा शंभर टक्के लागला
असून विद्यालयातील विद्यार्थिनींनी शाळेची यशाची परंपरा कायम ठेवत दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे
विद्यालयातून कु. बांगर पुनम दशरथ ९७.४० टक्के गुण मिळवून प्रथम आली तर कु. साळुंके स्नेह ल गोरख ९७.२० टक्के गुण
मिळवून द्वितीय आली आहे तर भोसले वैष्णवी हिने ९५ टक्के मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे . यंदाच्या झालेल्या बोर्डाच्या
परीक्षेमध्ये शाळेतून एकूण ८४ विद्यार्थीनी परीक्षेस बसल्या यामधून सर्वच विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत . यामध्ये विशेष
प्रविण्यामध्ये ४२ तर प्रथम श्रेणीत ३५ व द्वितीय श्रेणीत ७ अशा प्रकारे विद्यालयाचा निकाल लागला आहे. यशस्वी विद्यार्थीनीचे
शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.