Home » माझा बीड जिल्हा » शेतकरी मेळाव्यास उपस्थित रहा – बादाडे

शेतकरी मेळाव्यास उपस्थित रहा – बादाडे

शेतकरी मेळाव्यास उपस्थित रहा – बादाडे
डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी — मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच काडीवडगाव येथे आज शनिवार रोजी सांय 6.00 वाजता भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी केले आहे .
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाखा उदघाटन व भव्य शेतकरी मेळाव्यासह विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून अशोक तावरे राज्यउपाध्यक्ष , मिनाताई पाटील मराठवाडा महिला सचिव , शैलेश जाधव मनविसे जि.अ., वर्षाताई जगदाळे महिला जि.अ., रेखाताई आंबुरे महिला जि.अ., हे मान्यवर उपस्थित राहाणार आहेत तर प्रमुख उपस्थिती म्हणून मारुती दुनगु , सदाभाऊ बिडवे , यशवंत उजगरे , रणजित सोनवणे, विठ्ठल शिनगारे , आत्माराम डिसले , गणपत खोटे, रामेश्वर साळुंके, अशोक सुरवसे , मुस्तफा पठाण, अभिषेक गोल्हार , सुदर्शन नाईकवाडे, बालासाहेब राऊत सरपंच , भगवान बादाडे , राजेभाऊ बादाडे, विश्वनाथ शिंदे ,पञकार बांधव व इतर मान्यवर उपस्थित राहाणार आहेत .तरी मनसेच्या वतीने आज शनिवार रोजी काडीवडगाव , पिंपरखेड, देवडी, खापरवाडी , देवगाव येथे शाखा शुभारंभ व काडीवडगाव येथे सांय 6.00 वाजता शेतकरी मेळावा होणार आहे तसेच दि.10 जुन ते 16 जुन पर्यत वृक्षारोपण , रुग्णांना फळवाटप, संगणक माहिती पुस्तके वाटप या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तरी मनसेच्या आजच्या शाखा उदघाटन व शेतकरी मेळाव्याला हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक मनसे बीड जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.