Home » मनोरंजन » बिग बींची मनधरणीसाठी मंजुळेंना यश.

बिग बींची मनधरणीसाठी मंजुळेंना यश.

बिग बींची मनधरणी करण्यात मंजुळेंना यश.
डोंगरचा राजा / आँनलाईन
अमिताभ बच्चन, नागराज मंजुळे
मराठी चित्रपटसृष्टीत ‘सैराट’च्या अभूतपूर्व यशाने एका नव्या पर्वाची सुरुवात करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे लवकरच हिंदी कलाविश्वात पदार्पण करत आहेत. ‘झुंड’ या बॉलिवूड चित्रपटाचं ते दिग्दर्शन करत आहेत. ‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत मंजुळे काम करत होते. मात्र, काही कारणास्तव बिग बींनी या चित्रपटातून काढता पाय घेतला होता. अखेर त्यांची मनधरणी करण्यात मंजुळेंना यश आलं असून अमिताभ बच्चन चित्रपटात परतले आहेत.

गेल्या वर्षीपासूनच बिग बींनी या चित्रपटात काम करण्याची तयारी दाखवली होती. पण, कोणतंही कारण न देता या चित्रपटाचं चित्रीकरण वारंवार लांबवलं जात होतं. शिवाय इतर चित्रपट निर्मात्यांनाही त्यांनी आपल्या तारखा देणं अपेक्षित होतं. त्यामुळे फार काळ प्रतिक्षा न करता त्यांनी आता या चित्रपटातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागराज मंजुळेच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अमिताभ बच्चन असावेत, यासाठी निर्मात्यांचा प्रयत्न होते. त्यांनी केलेली मनधरणी अखेर यशस्वी ठरली आणि त्यांनी चित्रपट करण्यास होकार दिला. त्यामुळे आता ‘झुंड’ साकारणाऱ्या मंजुळेंपुढील मोठी अडचण दूर झाली आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘झुंड’ या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बी एका निवृत्त क्रीडा शिक्षकांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये अमली पदार्थांच्या व्यसनाधीन गेलेल्या एका मुलाचं आयुष्य फुटबॉल या खेळामुळे कसं सुधारतं याविषयीचं कथानक साकारण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.