आक्रोश मोर्चात सहभागी व्हा – कागदे.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीङ येथे 29/6/2018 रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चा संदर्भात वङवणीत रिपाइंची भव्य बैठक घेण्यात आली.बैठकीतील युवकांनी मोर्चा मध्ये लाखोंच्या संख्येने इतरांनाही सहभागी करुन घ्यावे असे आवाहन युवा रिपाई चे प्रदेश अध्यक्ष तथा रिपाई जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांनी केले.
वडवणी तालुका रिपाई अध्यक्ष महादेव उजगरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन बीङ येथे 29/6/2018 रोजी निघणाऱ्या आक्रोश मोर्चा संदर्भात येथील बचत गट हाँलमध्ये एका व्यापक बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवा रिपाईचे प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे यांची उपस्थिती होती.
त्याचबरोबर जिल्हासरचिटणीस राजु जोगदंङ,माजी सरपंच राजु वाघमारे,सुभाष तांगडे,शहराध्यक्ष प्रकाश तांगडे,दिपक जावळे,शाम वाघमारे,प्रज्वल उजगरे,राहूल तांगडे सह आदींची उपस्थिती होती.बैठकीस आलेल्या सर्व मान्यवरांचे फटाक्यांच्या अतिषबाजीत स्वागत करुन यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना कागदे म्हणाले की, दु:खीत, पिडीत यासह समाजाच्या मुलभुत प्रश्नांसाठी
रिपाई ची साथ असते आजही अनेक प्रश्न सभोवताली असुन ते मार्गी लागावेत म्हणून रिपाई ना.रामदास आठवले यांच्या सुचनेनुसार उपाययोजना राबवित आहे.येणाऱ्या २९ जुन रोजी रिपाई च्या वतीने बीड येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे.यामध्ये आपल्या प्रमुख मागण्या भिमा – कोरेगांव प्रकरणातील संभाजी भिडे ला अटक करा, अँट्रासिटी अँक्ट कायदा अधिक कडक करा या मागण्या असुन , गायराण जमिनीच्या मुलभुत प्रश्नांबाबतही सरकारला जाब विचारला जाणार आहे.तेव्हा या भव्य आक्रोश मोर्चामध्ये युवकांनी आपआपल्या गावातील नागरिकांना व तमाम युवकांना सहभागी करुन घ्यावे असे आवाहन ही युवा रिपाई प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे यांनी केले.कार्यक्रमाचे प्रस्थाविक तालुका अध्यक्ष महादेव उजगरे यांनी तर आभार माजी सरपंच राजु वाघमारे यांनी व्यक्त केले.
