Home » माझा बीड जिल्हा » वसंतराव नाईक विद्यालयाचे बोर्ड परीक्षेत.

वसंतराव नाईक विद्यालयाचे बोर्ड परीक्षेत.

वसंतराव नाईक विद्यालयाचे बोर्ड परीक्षेत.
अमोल जोशी / डोंगरचा राजा ऑनलाइन.
8 वर्षापासून प्रथम येण्याचा मान पटकावला.
– सानप श्रीकांत 97.40% प्रथम.
– कु.तांबे निकिता 96.20% व्दितीय.
– कु.श्रध्दा पोटे 95.40% तृतीय.
नुकतेच जाहिर झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालामध्ये पाटोद्यातील वसंतराव नाईक विद्यालयाने झालेल्या परीक्षेत उत्तुंग भरारी घेऊन यशाची परंपरा कामय ठेवुन सानप श्रीकांत या विद्यार्थ्यास 97.40 % तर कु.तांबे निकिता संजीव 96.20 %, कु.श्रध्दा शहाजी पोटे 95.40%, तर गिते शेखर चंदु 95% ,कु.वाघ अनघा काकासाहेब 95% या सह 90 % च्यापुढे 19 विद्यार्थ्यांनी तर 96विद्यार्थी विशेष गुणवत्ते तर 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीत गुण घेऊन यश संपादन केलेले असल्याने विद्यालयाच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. या विद्यालयातुन मार्च 2018 परीक्षेसाठी एकूण 125 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ करण्यात आले होते. या परीक्षेमध्ये विद्यालयाचा निकाल 97.65% लागला असुन सानप श्रीकांत या विद्यार्थ्यास 97.40 % प्रथम, कु.तांबे निकिता संजीव 96.20 % व्दितीय, कु.श्रध्दा शहाजी पोटे 95.40% तृतीय तर गिते शेखर चंदु 95% ,कु.वाघ अनघा काकासाहेब 95% या सह 90 % च्यापुढे 19 विद्यार्थ्यांनी तर 96विद्यार्थी विशेष गुणवत्ते तर 24 विद्यार्थी प्रथम श्रेणीत गुण घेऊन या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असुन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वसंतराव नाईक विद्यालयाच्या शिरोपेचात तुरारोवण्याचे काम यशस्वी विद्यार्थ्यांनी केले आहे.या विद्यालयाचा सातत्याने 8 व्या वर्षात एस.एस.सी.बोर्डाचा निकाल तालुक्यामध्ये सर्वप्रथम ठेवण्यामध्ये विद्यालयाच्या वतीने आतोनात मेहनतीने काम केले असल्यानेच यश मिळाले असल्याची प्रतिक्रीया पाटोदा तालुक्यात चर्चीली जात आहे. अभ्यासक्रमा बरोबरच या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी व स्पर्धापरीक्षेची पुर्वतयारी म्हणून शालेय पातळीवर मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांना राज्य,राष्ट्रीय व जिल्हा पातळीवरील सर्व स्पर्धापरीक्षेमध्ये उतरविले जात असुन वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षेमध्येही या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करुन अनेक शासकीय,निमशासकीय संस्थांच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी पात्र झालेले आहेत. या नुकत्यात जाहीर झालेल्या निकालावरुन वसंतराव नाईक विद्यालयाने तालुक्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
या मिळालेल्या यशाबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव श्री.रामकृष्ण बांगर ,मार्गदर्शीका सौ.सत्यभामाताई बांगर,विद्यालयाचे प्राचार्य श्री.तुकाराम तुपे,प्र.पर्यवेक्षक शेख गणी, स्पर्धापरीक्षा विभाग प्रमुख एम.आर.नागरगोजे,
के.डी.पाखरे, नवनाथ हांगे,एस.जी.
राजगुरु,सुनिल जाधव,एम.एम.मुळे,नागेश खेडकर,श्रीम.उज्वला जावळे,मोमीनसर,
सुनिल मस्कर,संजय राख सह विद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षक वशिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.