Home » माझी वडवणी » बीड मध्ये १२१ जणांना केले निलंबीत.

बीड मध्ये १२१ जणांना केले निलंबीत.

बीड मध्ये १२१ जणांना केले निलंबीत.
डोंगरचा राजा / आँनलाईन
संपकरी ST कर्मचा-यांवर बीडमध्ये कारवाई ; 121 जणांना करण्यात आले निलंबित.

बीड – वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचा-यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. बीड जिल्ह्यात एसटी प्रशासनाने या बंदची गंभीर दखल घेत संपकरी कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला दिवसभरात बीड विभागातील तब्बल १२१ कर्मचा-यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले.एसटीच्या या कारवाईमुळे संपकरी कर्मचा-यांत खळबळ उडाली असून ही कारवाई म्हणजे सरकारची जनरल डायर प्रवृत्ती असल्याची टीका संघटनेने केली आहे.

कमी पगारवाढ जाहीर केल्याने संतप्त झालेल्या एसटी कर्मचा-यांनी गुरूवारी मध्यरात्रीपासून अचानक संप पुकारला. यामुळे प्रवाशांची मात्र मोठी तारांबळ उडाली. बीड जिल्ह्यात बीडसह गेवराई, माजलगाव,अंबाजोगाई, धारुर, परळी, आष्टी ,पाटोदा या आठही आहारातील कर्मचारी संपात सहभागी होते. दिवसभरात एसटीच्या जिल्ह्यात केवळ १३१ फे-या झाल्या तर ५५६ फे-या रद्द कराव्या लागल्या. यामुळे जवळपास ३० लाख रुपयांचे एसटीचे उत्पन्न बुडल्याचे विभागीय नियंत्रक गौतम जगतकर म्हणाले. प्रवासी सेवेवर परिणाम आणि बुडालेले उत्पन्न यामुळे एसटी प्रशासनाने जिल्हाभरात संपकरी कर्मचा-यांवर कारवाईचा बडगा उगारला.तब्बल १२१ कर्मचा-यांना सेवेतून तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.

जनरल डायर सारखी कृती.
न्याय, मागण्यांसाठी लढणा-या १२१ कर्मचा-यांना निलंबित करणे ही सरकार आणि प्रशासनाची जनरल डायर प्रवृत्ती असून याचा निषेध करत असल्याची प्रतिक्रिया एसटी कामगार संघटनेचे बबन वडमारे यांनी “डोंगरचा राजा” शी बोलताना दिली

Leave a Reply

Your email address will not be published.