म.शि.प्र.मंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री सोळंके.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
बीड म.शि.प्र. मंडळाच्या अध्यक्षपदी माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांची फेरनिवड
महाराष्ट्ात सर्वात मोठी असलेल्या शैक्षणिक संस्था म्हणुन ओळखल्या जाणा-या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी मंत्री प्रकाश सोळंके यांची बहुमताने निवड झाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळासाठी आज निवडणुक झाली. या निवडणुकीमध्ये ३२९ पैकी २७७ मतांनी विजयी झाले तर त्यांचे विरोधक लहु पानसंबळ यांना ५२ मतांनी पराभव पत्कारावा लागला. आज सकाळी साडे दहा वाजता मतदान प्रक्रिया सुरू होउन दुपारी बारा वाजता पुर्ण मतदान प्रक्रिया थांबली.
साडेबारा वाजता निकाल लागला. यामध्ये माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचा २७७ मतांनी विजय झाला. त्यांच्या या विजयाबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळात आंनदोत्सव साजरा करण्यात आला. या शिक्षण प्रसारक मंडळात इंजिनिअर मॅनेजमेंटचे दोन, पॉलेटेक्नीक तीन, लॉ कॉलेज दोन, कॉलेज तेरा, शाळा हायस्कुल चाळीस, दहावीपर्यंत शाळा ५६, प्रायमरी तेरा, सिनीअर जुनिअर सहा असे १३६ विद्यालये, महाविद्यालये आहेत. प्रकाश दादांच्या या विजयाबद्दल माजलगांव मतदारसंघात मोठा आंनदोत्सव साजरा करण्यात आला.
