Home » माझी वडवणी » गुणवंतांचे जिल्हाधिका-यांनी केले कौतुक.

गुणवंतांचे जिल्हाधिका-यांनी केले कौतुक.

गुणवंतांचे जिल्हाधिका-यांनी केले कौतुक.
डोंगरचा राजा / आँनलाईन
बीड – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्लीद्वारा मार्च 2018 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचे निकाल जाहीर झाला असून गेवराई तालुक्यातील गडी येथील जवाहर नवोदय विद्यालयाची 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथील इयत्ता बारावीचे 97 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर इयत्ता दहावीमधील 94 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय, गढीचे इयत्ता बारावीमध्ये बाळेश्वर स्वामी यांने 92.7 टक्के, अनंत झनझुरे यांने 94 45 टक्के तर वैभव ठोंबरे यांनी 90.40 टक्के गुण प्राप्त केले आहेत. इयत्ता 10 वीमधील कु. दीप्ती श्यामसुंदर शिंदे या विद्यार्थीनीने 96.04 टक्के, वरद अशोक पालवे यांनी 96 टक्के तर कुमारी श्रद्धा नामदेव मिसाळ या विद्यार्थीनीने 95 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच वरद पालवे व कु. श्रद्धा मिसाळ यांनी मराठी विषयांमध्ये शंभर पैकी 99 गुण प्राप्त केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कौतूक केले आणि या विद्यार्थ्यासोबत संवाद साधला व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी श्री सिंह यांच्याशी संवाद साधतांना कु. दीप्ती शिंदे यांनी ऱ्हदयरोग तज्ञ होण्यार असल्याचे सांगून त्यानंतर सीव्हिल सर्व्हिसकडे जाण्याची इच्छा व्यक्त केली, वरद पालवे यांनी बालरोग तज्ञ व लोकसेवा आयोगाची तयारी तर श्रद्धा मिसाळ या विद्यार्थीनीने समाजातील गरजुची सेवा करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेवून मानसोपचार तज्ञ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांनी जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य प्रभुदास साबळे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.