Home » माझा बीड जिल्हा » मुलीच्या वाढदिवस आई- वडीलांचा देह दानाचा संकल्प.

मुलीच्या वाढदिवस आई- वडीलांचा देह दानाचा संकल्प.

मुलीच्या वाढदिवस आई- वडीलांचा देह दानाचा संकल्प.
अमोल जोशी / डोंगरचा राजा आँनलाईन
मुलीच्या पहील्या वाढदिवसानिमीत्त आई – वडीलांनी मरणोत्तर संपुर्ण देहदानाचा आदर्श व प्रेरणादायी संकल्प करुन आपल्या लेकीचा पहीला वाढदिवस अत्यंत अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे . येथील बेदरे दांपत्याने जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व मान्यवरांच्या उपस्थितीत मरणोत्तर संपुर्ण देहदानाचा फॉर्म भरुन संपुर्ण प्रक्रिया पुर्ण

केली .

पाटोदा येथील युवा पत्रकार महेश बेदरे यांना दोन मुली असुन दुसरी मुलगी सरस्वती ( सारा ) हिचा आज दि . २ जुन रोजी पहीला वाढदिवस आहे आपल्या मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन काहीतरी चांगला उपक्रम राबविण्याचे त्यांनी ठरवले  व त्यांनी पत्नी शिल्पा यांच्या सह मरणोत्तर संपुर्ण देहदानाचा संकल्प करण्याचे ठरवुन जामखेड येथील सामाजिक कार्यकतै तथा जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय कोठारी यांच्याशी संपर्क साधला व शुक्रवारी जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठान या ठिकाणी जावुन प्रत्यक्ष फॉर्म भरून ही प्रक्रिया पुर्ण केली, या प्रसंगी त्यांच्या समवेत जामखेड मेडीकल असो. चे  अध्यक्ष माऊली गायकवाड , पत्रकार संजय सानप, गणेश भळगट, अंकुश शिंदे आदी उपस्थित होते, या प्रसंगी प्रतिष्ठान च्या वतीने संजय कोठारी व सरला कोठारी यांनी बेदरे दांपत्याच्या या संकल्पच्या निर्णयाबद्दल सत्कार केला तसेच पाटोदा पत्रकार मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय जोशी जेष्ठ पत्रकार छगन मुळे संपादक संघाचे हामिद पठाण प्रशांत देशमुख अजय जोशी सुधीर एकबोटे अमोल जोशी पोपट राउत सचिन शिंदे सचिन गायकवाड़ यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रानी महेश बेदरे यांचे अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published.