Home » ब्रेकिंग न्यूज » 2016 च्या नुकसानीचे अनुदान 2018 ला आले. 

2016 च्या नुकसानीचे अनुदान 2018 ला आले. 

2016 च्या नुकसानीचे अनुदान 2018 ला आले. 

डोंगरचा राजा / ऑनलाइन.  

–तात्काळ वाटप करा – जयसिंह सोळंके.

33 गावांना 44 लाख 55 हजार 300 रु.

वडवणी तालुक्यातील अतिव्रष्टीने व गारपिठीने नुकसान झालेल्यांना शासनाची मिळनारी आर्थिक मदत तब्बल दीड वर्षाने आली असून सदारची मदत तातडीने वाटप करण्यात यावी म्हणून जी.प.सदस्यतथा रा.यू.कों.चे जिल्हाध्यक्ष  जयशिह सोळंके यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तहसीलदार यांना जाब विचारला तेंव्हा कुठे हे अनुदान वाटप करणी करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला असल्याचे चित्र दिसत आहे.

वडवणी तालुक्यातील 33 गावांना 2016 मध्ये झालेल्या अतिव्रष्टीने व गारपिठीने आर्थिक संकटात टाकले. अनेकांच्या  उपजीविकेचेसाधने व घरेदारे उधव्स्थ झाली. घरांची पडझड होऊन हजारो कुटुंबियांना आपला संसार उघड्यावर घेऊन बसावे लागले आलेलीअतिव्रष्टीने व गारपिठीने पडलेली घरे जीवन जगायचे कसे हा मोठाप्रश्न अनेक कुटुंबासमोर निर्माण झाला होता. सरकार कडून न्यायमिळेल का? या मनस्थितीत असणारे कुटुंबप्रमुख मदतीच्या अपेक्षेने आ.. वासून बसला होता सन. 2016 ला झालेल्या अतिव्रष्टीने व गारपिठीचे पंचनामे तर केले मात्र 2017 आले अन गेले तरी मदत मिळाली नाही. 2018 ला सरकारला जाग आली. प्रशासनाने कागदांची जुळवाजुळव केली आणि तालुक्यातील 33 गावांमधील 1 हजार 392 लाभार्थ्यांना प्रतेकी 3 हजार 200 प्रमाणे 44 लाख 55 हजार 300 रुपये ऐवढा निधि तहशील कार्यालयाकडून पंचायतसमितीच्या विभागात जमा झाली मात्र मदत येऊनही ती वाटप केली जात नाही अशा तक्रारी सुरू झाल्या. सदरचे अनुदान मिळावेयासाठी अनेकांनी जी.प.सदस्य तथा रा.यू.कों.चे जिल्हाध्यक्ष जयशिह सोळंके यांच्याकडे तक्रारी केल्या या प्रकरणाची सोळंके यांनी गंभीर दखल घेऊन कांही दिवसापुर्वीच तहशीलदार यांची भेट घेऊन जाब विचारला तहशीलदार यांनी याची माहिती घेत श्री.सोळंके यांना हा निधि लवकरच वाटप केला जाईल याची हमी दिली. यावेळी तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, दिनेश मस्के, औदुंबर सावंत,गनेश शिंदे, संतोष पवार,विस्वास आगे, विठलभूजबळ,भागवत उजगरे सह आदींची उपस्थिती होती॰

 

 

कोट ….

लाभर्थ्यांच्या खात्यावर निधि जमा होणार :-जयसिह सोळंके

2016 ला घरांची पडझड,गारपीट, अतिव्रष्टीने नुकसान झालेल्या लाभर्थ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळालेली नाही संम्ब्धितांकडून माहिती घेतली असता सदरचा निधि ग्रामसेवकामार्फत लाभार्थ्यांचे खाते नंबर घेऊन त्यावर तो निधि थेट जमा होणार आहे. असे सांगत 2016 ला झालेली नुकसान भरपाई 2 वर्षाने मिळत आहे. ही शोकांतीका म्हणावी लागेल. यापुढे कांही अडचणी निर्माण झाल्यास सदर लाभर्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असा शब्द जी.प.सदस्य तथारा.यू.कों.चे जिल्हाध्यक्ष जयशिह सोळंके यांनी डोंगरचा राजा च्या माध्यमातून जनतेला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.