Home » ब्रेकिंग न्यूज » यवतमाळमध्ये अपघातात १० ठार.

यवतमाळमध्ये अपघातात १० ठार.

यवतमाळमध्ये अपघातात १० ठार.
डोंगरचा राजा / आँनलाईन
नांदेडला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; यवतमाळमध्ये अपघातात १० ठार
पंजाबमधील एक कुटुंब चार कारमधून नांदेडला दर्शनासाठी जात होते.
देवदर्शनासाठी नांदेडला जाणाऱ्या कुटुंबाचा यवतमाळमध्ये अपघातात मृत्यू झाला. यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात मृत्यूमुखी पडलेले कुटुंब हे पंजाबचे रहिवासी असल्याचे समजते.

पंजाबमधील एक कुटुंब चार कारमधून नांदेडला दर्शनासाठी जात होते. यवतमाळ- नांदेड मार्गावर कोसदनी घाटात यातील एका कारला ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.