Home » माझी वडवणी » पिक कर्ज वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन -बादाडे.

पिक कर्ज वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन -बादाडे.

पिक कर्ज वाटप करा अन्यथा तीव्र आंदोलन -बादाडे.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– मनसेने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्ज माफी करून कर्ज माफीच्या याद्या व रक्कम बँकेला दिलेल्या आहेत परंतु बँकेच्या घोळा मुळे कर्ज माफीचा घोळ अद्यापही मिटलेला नाही त्यामुळे यावर्षीचे पिक कर्ज वाटप बँकांनी सुरू केलेले नाही तसेच इंधन दरवाढ केल्याने जनतेला आर्थिक भुरदंड सोसावा लागत असून जनता महागाईच्या आगीत होरपाळत आहे तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व बँकेच्या शाखेतुन तात्काळ पिक कर्ज वाटप सुरू करावे व इंधनदर वाढ कमी करावी नसता मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे मनसे जिल्हा अ.श्रीराम बादाडे यांनी दिला आहे .
सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून शेतकरी आजमित्तीस कमी पिक उत्पादन ,बोंडअंळी ,योग्य भाव न मिळाल्यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून बि-बियाणे ,खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत .त्यामुळे शेतकऱ्यांना दरवर्षी पिक पेरणी करण्यासाठी बँके कडुन मिळणाऱ्या पिक कर्जाचा आधार असतो परंतु राज्य सरकारने शेतकऱ्यांना पिक कर्ज माफी जाहीर करून शेतकऱ्यांच्या नावाच्या याद्या व रक्कम बँकाला पाठविलेल्या आहेत .परंतु बँक प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे अद्यापही कर्ज माफीचा घोळ मिटलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पिक कर्जा पासून वंचित राहावे लागत आहे .तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना इंडिया बँक , हैद्राबाद बँक ,महाराष्ट्र बँक व इतर सर्व गाव दत्तक असणाऱ्या बँका कडुन शेतकऱ्यांना तात्काळ पिक कर्ज वाटप सुरू करावे व केंद्र सरकारने पेट्रोल ,डिझेल इंधन दरवाढ केल्याने जिवना आवश्यक वस्तुच्या किंमती वाढल्याने सामान्य जनता महागाईच्या खाईत होरपाळत आहे .तरी इंधन दरवाढ कमी करावी व बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी तात्काळ पिक कर्ज वाटप सुरू करावी नसता मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दि.31 मे रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे मनसे जिल्हा अध्यक्ष श्रीराम बादाडे , मनविसे जि.अ.शैलेश जाधव , महिला जि.अ.वर्षाताई जगदाळे , रेखाताई आंबुरे , सदाशिव बिडवे , मारूती दुनगु, अशोक सुरवसे , गणपत खोटे, रामेश्वर साळुंके , आत्माराम डिसले , प्रशांत शिनगारे , गोविंद देशमाने, दिक्षा डोंगरे , मुस्तफा पठाण, सुनिल चव्हाण , अभिषक गोल्हार , सुदर्शन नाईकवाडे, हरिचंद्र पवार , गणेश वाघमारे , यांनी दिला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.