Home » माझा बीड जिल्हा » नाममुळे झाले पाणीदार गाव – अँड.देशमुख.

नाममुळे झाले पाणीदार गाव – अँड.देशमुख.

नाममुळे झाले पाणीदार गाव – अँड.देशमुख.
डोंगरचा राजा / आँनलाईन
– शिदेवाडीतील ते तेरा बंधारे पावसाळ्यापूर्वीच तुडुंब भरले.
आष्टी तालुक्यातील शिदेवाडी गावात नाम फाऊंडेशनची टू टेन मशीन जोरात चालली. मशीन नामची आणि डिझेल शेतकऱ्यांचे या पद्धतीने तब्बल तेरा बंधाऱ्यातील एकूण साडेतीन किलोमोटर लांबीच्या नदीतील गाळ काढला. गाळ काढून तीन आठवडे झाले. आणि काल आलेल्या वादळी पावसाने चक्क सर्व तेरा बंधारे पाण्याने भरले. गावातील लोक आता पाण्याकडे मोठ्या आनंदाने पहात आहेत. गावकऱ्यांच्या आनंदात नाम सह जन आंदोलन सहभागी असून आणखी काही गावं पाणीदार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
गावकऱ्यांनी अँड. अजित देशमुख यांच्याकडे मशीनची मागणी केली असता त्यांनी नामशी संपर्क साधून राजाभाऊ शेळके यांच्यामार्फत मोठी पोकलेन मशीन मोफत मिळवून दिली होती. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून या मशीनमध्ये दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचे डिझेल टाकले. एवढ्या पैशात जवळपास एक महिना पोकलेन चालले. काढलेला गाळही शेतात टाकला. जमीन यामुळे सुपीक होणार आहे.
पावसाळ्याचे आगमन होण्यापूर्वीच काल झालेल्या पावसाने हे सर्व बंधारे पूर्ण भरले. बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग शेतीला होईल. जमिनीत मुरणाऱ्या पाण्याने पाण्याची पातळी वाढेल. शेतकरी आणि गावकरी पाणी समृद्ध होईल. शेतकऱ्यांचे जिवनमान आता उंचावेल. या गावातील शेतकरी मेहनती आहे. त्यामुळे आता गावात शेतीतून होणारे उत्पन्न दुप्पट होईल.
एकीकडे नदी रुंदीकरणाचे काम झपाट्याने झाले. उकरलेले नदी पात्र मोठे झाल्याने आता पाणी भरपूर साठले आहे. ही बाब ग्रामस्थांना आनंद देत आहे. नदीतील गाळ शेतकऱ्यांनी शेतात टाकला. जमीन काळी झाली. त्यामुळे त्यांच्यात आणखी उत्साह निर्माण झाला आहे. गावातील डॉ. राजेंद्र जरांगे यांच्या नेतृत्वाखाली सचिन काकडे, संतोष खंडागळे, संजय दरेकर, राहुल केरूरकर, संजय खंडागळे, यांच्यासह इतरांनी यात झोकून दिले होते.
पोकलेन मशिनने नदी खोलीकरणाचे काम करत असताना या गावाची पूर्ण तालुक्यात चर्चा झाली आहे. परिसरातील गावातील अनेक लोक हे काम पहायला येत आहेत. आता ते पाणी पहायला येतील.
विकास समोर दिसत असल्याने आणि पाणी टंचाईचा मुद्दा संपणार असल्याने गावात आणखी परिवर्तन झालेले दिसणार आहे. नदी खोल झाल्यानंतर नदीत असलेल्या बंधाऱ्यांपैकी काही ठिकाणी अजून पाणी कसे रोखल्या जाईल याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे आता हे पाणी गावकऱ्यांच्या डोळ्याचे पारणे फेडायला लावणार आहे.
नाम मुळे शेतकरी एकवटला. अँड. अजित देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. कोणाचाही आधार न घेता गावकऱ्यांनी स्वतः सहभाग घेतला की काम मार्गी लागते. हे शेतकऱ्यांनी जाणून घेतले आहे. लोक सहभाग आणि मनातून काम करण्याची जबरदस्त इच्छा झाली की, विकास होतो, ही बाब गावकऱ्यांना समजली. नाम मुळे गावकऱ्यामधील उत्साह, लोक सहभाग, लोक जागृती झाली आणि हीच खरी कमाई झाली. मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांवर गावातील जनता खुश झाली आहे. राजकारण विरहित झालेला हा प्रयोग आहे. आता परिसरातील गावात अशी सुधारणा करता येईल का ? याकडे आपण लक्ष देणार असल्याचे देशमुख यांनी म्हंटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.