Home » ब्रेकिंग न्यूज » कृषीमंत्री फुंडकरांना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर.

कृषीमंत्री फुंडकरांना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर.

कृषीमंत्री फुंडकरांना निरोप देण्यासाठी लोटला जनसागर.
डोंगरचा राजा / आँनलाईन

राज्याचे क़ृषीमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर अनंतात विलीन झाले आहेत. खामगाव येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवारी मुंबईतील सोमय्या रुग्णालयात ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं होतं. आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी खामगावात जनसागर लोटला होता. अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहब दानवे यांच्यासहित अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

३१ मे रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पांडुरंग फुंडकर यांनी मुंबईतील सोमय्या रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ६७ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

फुंडकर हे भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते होते. त्यांनी यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही सांभाळले होते. वर्ष १९९१ ते ९६ या काळात त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. फुंडकर यांनी तीन वेळा अकोला लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. त्यांनी १९७८ आणि १९८० मध्ये खामगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. फुंडकर हे विधानपरिषदेतील विरोध पक्षनेतेही होते. ८ जुलै २०१६ रोजी त्यांनी फडणवीस मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.

Leave a Reply

Your email address will not be published.