वडवणीचे सेतु सुविधा केंद्र सुरु करा – साबळे
डोंगरचा राजा / आँनलाईन
वडवणी तहसिल कार्यालयाचे प्रशासकीय इमारतीत सेतु सुविधा केंद्र असुन ते गेल्या महिन्यापासुन बंद आहे.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन याठिकाणी असलेले सेतु सुविधा केंद्र तात्काळ सुरु करावे अन्यथा शेतकरी, शेतमजुर,
निराधार,विद्यार्थी यांच्या साथीने तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, सभापती सौ.विमल गणेश शिंदे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, तहसिल कार्यालयाचे प्रशासकीय इमारतीत असणारे सेतु सुविधा केंद्र हे गेल्या महिन्यापासुन बंद आहे.या केंद्रा अंतर्गत मिळणारी शेतकऱ्यांचे सात बारा, वा इतर कामे, शेतमजुर , निराधार यांना लागणारे उत्पन्न प्रमाणात , शालेय , महाविद्यालया च्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी जात प्रमाणपत्र , उत्पन्न , रहिवासी , राष्टीयत्व ,नाँनक्रिमिलीयर प्रमाणपत्र यासह आदी लाभार्थ्यांचे विविध प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत.बंद केली त्याची कारणे प्रशासनाने शोधीत बसावे .इकडे सर्वांना अडचणी निर्माण होत आहेत.तेव्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन येथील सेतु सुविधा केंद्र पुर्वरत सुरु करावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने तालुक्यातील शेतकरी शेतमजुर
,निराधार , शालेय , महाविद्यालयाचे विद्यार्थी यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा खणखणीत इशारा तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाव्दारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष बजरंग साबळे, सभापती सौ.विमल गणेश शिंदे यांनी दिलाआहे.