Home » देश-विदेश » डॉ.आंबेडकर विश्वविख्यात होण्यात रमाबाईंचे योगदान : राष्ट्रपती

डॉ.आंबेडकर विश्वविख्यात होण्यात रमाबाईंचे योगदान : राष्ट्रपती

डॉ.आंबेडकर विश्वविख्यात होण्यात रमाबाईंचे योगदान : राष्ट्रपती

डोंगरचा राजा / आँनलाईन
पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांचे योगदान अतुलनीय होते. रमाबाईंनी केलेला त्याग त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेली साथ, प्रेरणा आणि त्यांच्या संघर्षाच्या काळात दिलेला पाठिंबा या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जडणघडणीतील महत्वाची बाबी आहेत. त्यामुळे आंबेडकरांना विश्वविख्यात बनवण्यात निर्णायक वाटा रमाबाईंचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज पुण्यात केले.

पुणे महानगरपालिकेच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उद्यानात रमाबाई आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अनावरण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, श्रीनाथ भीमाले आदी उपस्थित होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, डॉ. आंबेडकरांचे रमाबाईंवर अतिशय प्रेम होते. त्यांनी आपले ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हे पुस्तकही रमाबाईंना अर्पण केले आहे. या पुस्तकाच्या अर्पण पत्रिकेतून त्यांच्या रमाबाईंवरील प्रेमाची अनुभूती येते. संविधानकर्त्या आंबेडकरांना साथ देणाऱ्या रमाबाईंच्या जीवनातून प्रत्येक भारतीय महिलेने प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल मांडून महिलांना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी नेहमी महिलांचे अधिकार आणि सक्षमीकरणाचा विचार मांडला. त्यांच्या या विचारापाठीमागे मातोश्री रमाबाई यांची प्रेरणा होती, असे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.