Home » महाराष्ट्र माझा » ‘शिवशाही’ त ज्येष्ठ नागरीकांना सवलत.

‘शिवशाही’ त ज्येष्ठ नागरीकांना सवलत.

‘शिवशाही’ त ज्येष्ठ नागरीकांना सवलत.
डोंगरचा राजा /आँनलाईन
▪ एस.टी.च्या ७० व्या वर्धापन दिनाची भेट; मंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

मुंबई — एस.टी.बसमधून प्रवास करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना एस.टी.च्या ७० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन शिवशाही या वातानुकूलित बसमध्ये सवलत देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन व खरभूमी विकास मंत्री व एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली.

सध्या एस.टी.च्या साध्या, रातराणी व निमआराम बससेमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. अशा प्रकारची सवलत नव्याने सुरू झालेल्या शिवशाही बसेसमध्ये सुद्धा मिळावी.अशी मागणी अनेक ज्येष्ठ नागरिकांना मंत्री रावते यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत मंत्री दिवाकर रावते यांनी या बाबत एस.टी. प्रशासनास प्रस्ताव तयार करण्यास सांगितले होते. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या वातानुकूलित शिवशाहीच्या आसन श्रेणीतील बसेसमध्ये एकूण तिकीट मुल्याच्या ४५ टक्के तर वातानुकूलीत शिवशाहीच्या शयनयान श्रेणीतील बससेमध्ये (एसी स्लीपर) एकुण तिकीट मुल्याच्या ३० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

येत्या १ जून, २०१८ रोजीपासून म्हणजे एस.टी.च्या ७० व्या वर्धापन दिनापासुन ही सवलत राज्यभर लागू करण्यात येत आहे. याचा लाभ राज्यातील सर्व ज्येष्ठ प्रवाशांना मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.