Home » राजकारण » भाजपाची उद्या महत्वाची बैठक.

भाजपाची उद्या महत्वाची बैठक.

भाजपाची उद्या महत्वाची बैठक.
डोंगरचा राजा / आँनलाईन

– सर्व आघाड्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे – शिवाजी गुट्टे, नेताजी देशमुख, जुगलकिशोर लोहिया.

येत्या 3 जुन रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री ना. उमा भारती, राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ह. भ. प. रामराव महाराज ढोक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी उद्या गुरुवारी परळी विधानसभा मतदारसंघ भाजपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस पक्षाच्या सर्व आघाडीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व बुथ प्रमुख यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुवार दि. 31 जुन रोजी सकाळी 10 वाजता यशःश्री बंगला येथे या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 3 जुन रोजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री ना. उमा भारती, राज्याचे महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री ना. चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, ह. भ. प. रामराव महाराज ढोक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांचा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे. वैद्यनाथ साखर कारखाना परिसरातील गोपीनाथ गड येथे हा कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. यासाठी लाखो नागरिक येणार असून सर्वांची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून कार्यक्रमाच्या तयारीसाठी या महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या बैठकीला परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच सर्व शासकीय समित्यांचे पदाधिकारी व सर्व बुथ प्रमुख यांनी बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन भाजपचे परळी तालुकाध्यक्ष शिवाजी गुट्टे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, परळी शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.