प्रत्येकाकडे “महाराष्ट्र वार्षिकी”असावे- डाँ.भापकर
डोंगरचा राजा /आँनलाईन
औरंगाबाद– महाराष्ट्राची विविध क्षेत्रातील माहिती आकडेवारीसह देण्यात आली असून इतिहास, भूगोल, जनजीवन, शासनाच्या विविध योजना, महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ निर्णय विधी मंडळ विविध स्वरुपातील महत्वाच्या माहितीचा साठा एकाच ग्रंथात उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे ”महाराष्ट्र वार्षिकी” हा ग्रंथ वाचनिय उपयुक्त आणि अधिकृत संदर्भ ग्रंथ बनला असून प्रत्यकाने तो संग्रही ठेवावा असे आवाहन मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
माहिती जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र वार्षिकी 2018’ हा ग्रंथ संचालक (माहिती) देवेंद्र भुजबळ यांनी आज आयुक्तांना भेट दिला. या संदर्भ ग्रंथाबद्दल प्रशंसा करताना डॉ. भापकर म्हणाले की ‘ महाराष्ट्र वार्षिक 2018’ सारखे एकाच ठिकाणी शासनाच्या सर्व विभागीय आणि राज्याच्या भौगोलीक, राजकीय, सांस्कृतिक बांबीची माहिती एकत्रितपणे उपलब्ध करुन दिली असल्याने पत्रकार, सर्व स्पर्धा परीक्षाचे विद्यार्थी, संशोधक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थींयांच्यासाठी हा उपयुक्त संदर्भ ग्रंथ असल्याचे सांगितले.
यावेळी उपायुक्त पारस बोथरा, सुर्यकांत हजारे यांची उपस्थिती होती.
*******
