कु.संजना उजगरे हिस ९० टक्के गुण.
डोंगरचा राजा /आँनलाईन
नुकत्याच झालेल्या सिबीएसई परिक्षेचा निकाल जाहिर झाला असुन गुरुकुल ईग्लिश स्कुल ची विद्यार्थीनी कु.संजना बाबासाहेब उजगरे हिने ९० टक्के गुण प्राप्त केले असुन तिचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
वडवणी येथील रहिवासी व वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी बाबासाहेब उजगरे यांची कन्या कु.संजना बाबासाहेब उजगरे ही बीड येथील गुरुकुल ईग्लिश स्कुल ची विद्यार्थीनी इ.१० वी.च्या वर्गात शिक्षण घेते.नुकतीच सिबीएसई परिक्षा झाली होती .या सिबीएसई परिक्षेत तिने ९० टक्के गुण प्राप्त केले. तसेच इंग्रजी विषयात १०० पैकी १०० गुण घेऊन वर्गात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.कु.संजना हिने डोंगरचा राजा शी संवाद साधतांना अपणास प्रथम डाँक्टर तर नंतर आयएएस होण्याचा संकल्प व्यक्त केला .