Home » माझा बीड जिल्हा » पाटोद्यात अहिल्यादेवी होळकर पदयात्राचे जंगी स्वागत.

पाटोद्यात अहिल्यादेवी होळकर पदयात्राचे जंगी स्वागत.

पाटोद्यात अहिल्यादेवी होळकर पदयात्राचे जंगी स्वागत.
अमोल जोशी / डोंगरचा राजा.
पाटोदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९३ व्या जयंतीनिमित्त सालाबादप्रमाणे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथून अहिल्यादेवी होळकरांचे जन्मस्थान असलेल्या चौंडी या गावी भव्य-दिव्य पदयात्रा निघाली असून हे यात्रेचे ४ थे वर्ष आहे पदयात्रेमधील रथामध्ये अहिल्यादेवी होळकरांची भव्य-दिव्य मूर्ती आहे . या पदयात्रेचे  पाटोदा येथे आगमन झाल्यानंतर श्री संत वामनभाऊ पेट्रोलियम जवळ पदयात्रेमधील मा.जि.प.अध्यक्ष संभाजीराव धूळगुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर सर्वांना चहा व थंडगार  पिण्याच्या पाण्याची सोय केली होती .संभाजीराव धूळगुंडेहे म्हणाले “पाटोदेकरांनी केलेला हा सत्कार अविस्मरणीय असेल तो कायम आपल्या लक्षात राहील .आम्ही सर्व भारावून गेलो आहोत”. आप्पासाहेब राख म्हणाले कि,”अहिल्यादेवी होळकर यांच्या पदयात्रेकरूंसाठी आम्हाला चहा पाणी करण्याची संधी लाभली  यातच आम्ही आमचे भाग्य समजतो . पुढच्या वर्षी पदयात्रेकरूंसाठी चहापानासोबत नाश्त्याची सोय करण्यात येईल .” यावेळी नगरसेवक नयूमभाई पठाण तलाठी देशमुख काका, नाना राख,बाळू राख,विनोद राख , बंडू खाडे, नजान सर,राजेंद्र गोरे नवनाथ जाधव ,प्रशांत देशमुख रामदास निंगुळे यांच्यासह अनेकजन उपस्तिथ होते चहापानंनंतर दिंडी चौंडी च्या दिशेने मार्गस्थ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published.