पाटोदकरांना आता रुपयात शुद्ध पाणी.
अमोल जोशी/ डोंगरचा राजा.
पाटोदा गावच्या लेकीनी तब्बल दीड लाखांचे जलशुद्धिकरण मशीन गावासाठी दिल असून अवघ्या 1 रूपायत आता पाटोदकर शुद्धपाणी पीत आहेत शहरातील जैन स्थानक भामेश्वर मंदीर जवळ येथे हे शुद्ध पाणी मिळते शहरातील हा असा पहिलाच शुद्धपाण्याचा प्लांट आहे याबाबत अधीक माहिती अशी येथील कै किसनलाल कांकरिया यांच्या तिन मुली विवाहानंतर वेगवेगळ्या गावांत राहतात काही दिवसापूर्वी किसनलालजी यांचे निधन झाले यावेळी त्यांच्या तिन्ही मूली पाटोदा येथे आल्या होत्या त्यावेळी सहज पाणीप्रश्नाचा विषय निघाला पाटोदा येथे नळाला येणारे पाणी कुणीही पित नाही कारण नळाला येणारे पाणी पिण्यायोग्य येत नाही या गोष्टीचा विचार करुण पाटोदा माहेर असलेल्या राठोड कांचन कोठारी लताबाई चोरडिया प्रीती या पाटोद्याच्या लेकीनी पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल दीड लाख रूपये किमतीचे जलशुद्धिकरण आर ओ मशीन विकत घेऊन पाटोदा जैन संघटनेकडे सुपुर्द केला मात्र सध्या पाणीटंचाई खुप असल्यामुळे पाण्याचा प्रश्न बिकट होता जैन मंदीर जवळच राहणारे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक विजय जोशी यांनी आपल्या स्वतःच्या बोअरचे पाणी या जलशुद्धिकरण प्लांटला मोफत दिले त्यामुळे 28 मे रोजी लोकासाठी हा प्रकल्प सुरु झाला लोकांना अवघ्या1रुपयात एक बिसलेरी बाटली तर 5 रुपयात 20 लीटर शुद्ध व थंडगार पाणी मिळू लागले आहे या उद्घाटन कार्यक्रमास नगरसेवक विजय जोशी माजी सरपंच बाळासाहेब राख शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख नगरसेवक संदीप जाधव जैन संघटनेचे मिट्ठूलाल कांकरिया शांतिलाल संजय कांकरिया कांकरिया अजित कांकरिया अजिंक्य बोरा संतोष कांकरिया सुनील कांकरिया पत्रकार महेश बेदरे प्रशांत देशमुख अमोल जोशी सुधीर एकबोटे यांच्यासह परिसरातील व्यापारी उपस्तिथ होते पहिल्याच दिवशी तब्बल 1हजार लीटर फिल्टर पाणी लोकांनी नेले या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे
चौकट
सध्या धोंड़याचा महीना सुरु असून सर्व लेकी व जावाई या महिन्यात आईवडिलाकडे येतात व धोंडे जेवण करुण धोंडेदान ही घेतात मात्र गावच्या या लेकीनी आपल्या माहेरच्या गावाला जलशुद्धिकरण मशीन भेट देऊन एक चांगला संदेश दिला
चौकट
गेल्या पंधरा दिवसापूर्वी जैन संघटनेच्या लोकांनी मला तुमच्या बोअरचे पाणी दया या कामासाठी हे एक चांगले सामाजिक काम आहे त्यामुळे मी मोफत पाणी दिले आहे विजय जोशी नगरसेवक नगरपंचायत पाटोदा
चौकट
हे शुद्ध पाणी वाटताना यातून जी रक्कम गोळा होणार आहे लाईटबिल व् मेंटनन्स चा खर्च सोडुन उर्वरित रक्कम सामाजिक कामा साठी वापर करु मिट्ठूलाल कांकरिया जैन संघटना