Home » राजकारण » कॉलर उडविणे “ऐऱ्या गैऱ्याचे” काम नाही- ना.

कॉलर उडविणे “ऐऱ्या गैऱ्याचे” काम नाही- ना.

कॉलर उडविणे “ऐऱ्या गैऱ्याचे” काम नाही- ना. खोत.
सातारा / डोंगरचा राजा आँनलाईन.
खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी विकास कामे करून जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली आहे. अशा महाराज पक्षासाठी नाहीत पक्ष त्याच्यासाठी आहे. ते व्यक्तीमत्व मोठे आहे, त्याना कोणत्याही पक्षाची गरज नाही. पक्ष त्याच्यासाठी आहेत. कॉलर उडविणे हे कोणा ” ऐऱ्या गैऱ्याचे ” काम नाही. कॉलर फक्त उदयनराजेंनीच उडवावी असा टोला राज्याचे कृषी मंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे नाव न घेता टोला लगावला.

सातारा राजधानी महोत्सवा प्रसंगी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, श्री छ. राजमाता कल्पना राजे भोसले, आ. जयकुमार गोरे. भाजपच्या प्रवक्त्या आणि माजी आमदार कांताताई नलवडे, डॉ. दिलीप येळगावकर, सदाभाऊ सपकाळ, नगराध्यक्षा माधवी कदम याच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
सदाभाऊ खोत पुढे म्हणाले, उदयनराजेनी आपल्या कार्यशैलीतुन जनतेच्या मनात घर केले आहे. सातारा राजधानी महोत्सव हा एक वेगळा संदेश देणारा ठरेल. राजे तुम्ही या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आणि आम्ही येणार नाही। असे कधी होणार नाही. महाराज तुम्ही आम्हाला कधीही हाक द्या, मी आणि महादेव जानकर तुमच्यासाठी हजर राहू.

ना. महादेव जानकर म्हणाले, जनतेचा राजा कसा असावा हे तुम्ही दाखवून दिले आहे. छत्रपतीच्या नावाने अनेकांनी पक्ष काढून सत्ता मिळविल्या आहेत. उदयनराजेंच्यामध्ये राजकीय गड जिकण्याची ताकत आहे. आता मोठ्या पक्षापेक्षा छोट्या पक्षाना महत्व आले आहे. महाराजांना नव्हे तर पक्षाना त्यांची गरज आहे. उदयनराजे हे महाराष्ट्रात नाहीतर देशात किंग आहेत.
खा. उदयनराजे म्हणाले, कॉलर लय चर्चा झाली. न कॉलरचे शर्ट घातलेले बरे. पण कॉलरचे शर्ट घातले नाही तर ओळख रहाणार नाही. मी काळे कृत्य कधी केले नाही. म्हणून मी कॉलर उडवतो. मी पदाला मी महत्व देत नाही. जनतेच्या हृदय हेच माझे मोठे पद आहे. त्या पदाला मी तडा जाऊ देणार नाही. मी राजा नाही तर जमलेली ही जनताच खरी राजा आहे. या कार्यक्रमाला जनतेने लावलेली उपस्थिती हे जनतेचे खरे प्रेम आहे. राजधानी महोत्सव हा ग्रामीण भागातील मुलांना वाव मिळावा यासाठी या कार्यक्रम आयोजित केला आहे. मी जनतेच्या विश्वास तडा जाऊ देणार नाही, असे त्यानी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.