Home » महाराष्ट्र माझा » आयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड. आंबेडकरांचा आरोप.

आयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड. आंबेडकरांचा आरोप.

आयोग आणि सरकारचे कारस्थान – अँड.
आंबेडकरांचा आरोप.
डोंगरचा राजा / आँनलाईन.
भंडारा-गोंदिया येथिल लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मात्र, येथिल अनेक मतदार केंद्रांवर इव्हीएम बंद असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. येथे ४५० मतदान यंत्रे बंद असून ही यंत्रे निवडणूक आयोग आणि सरकारने जाणीवपूर्वक कारस्थान करीत बंद केल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आंबेडकर म्हणाले, भंडारा-गोंदिया हा आदिवासी बहुल भाग आहे. भंडाऱ्यात सध्या ४७ डिग्री तापमान असून मतदान यंत्रे पुन्हा सुरु होऊन मतदान करता येईल यासाठी येथे अनेक तास मतदार ताटकळत बसले आहेत. येथे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचीही सोय नाही. पाण्याच्या ठिकाणांपासून मतदान केंद्रे बरीच लांब असल्याने नागरिक वैतागले आहेत.

दरम्यान, बंद मतदान यंत्रांची देखभाल कशी करण्यात आली ती कोणी केली त्या लोकांची नावे निवडणूक आयोगाने उघड करावीत अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भंडारा आणि गोंदिया या दोन्ही ठिकाणच्या अनेक मतदान केंद्रांवर मतदान केंद्रे योगायोगाने बंद असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा निव्वळ योगायोग नसून या दोन्ही जागांवर भाजपा हारत असल्यानेच इथले मतदान यंत्रे सरकारने निवडणूक आयोगाच्या मदतीने बंद पाडण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

येथील मतदान केंद्रांवर चार-चार तास मतदान यंत्रे बंद असल्याने लोक पुन्हा केंद्रांवर येऊन जात आहेत. मात्र, दोन-दोन किमी पाड्यांवर पुन्हा जाऊन येण्यामुळे त्यांना मनस्तापाला समोरे जावे लागत आहे. मात्र, आल्यानंतर पुन्हा यंत्रे सुरु होतील की नाही याची खात्री नसल्याने येथील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंबेडकर यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. त्यावर फोनवरुन तक्रार करा असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. मात्र, येथील पाड्यांवरून फोनही लागत नसल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व गोंधळामुळे भंडारा-गोंदियात फेरनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.