Home » ब्रेकिंग न्यूज » मान्सून अंदमानात दाखल.

मान्सून अंदमानात दाखल.

मान्सून अंदमानात दाखल.
डोंगरचा राजा /आँनलाईन.

यावर्षी पावसाचे आगमन वेळेत होणार आहे. कारण मान्सून अंदमानात दाखल झालाय. मान्सूनची पुढील वाटचालीसाठीही वातावरण अनुकूल, असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेय. मान्सून २३ मे २०१८च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला होता. मात्र, दोन दिवस उशिराने मान्सून दाखल झालाय. त्यामुळे यावेळी वेळेत गोवा आणि मुंबईत पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेय. येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अंदमानच्या किनाऱ्यावर येऊन धडकण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली होती. तसेच गेल्या दोन तीन दिवसात हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनच्या प्रगतीसाठी योग्य वातावरण तयार झाले होते. या पोषक वातावरणामुळे अखेर मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय. हवामान विभागाकडून गेल्या आठवड्यात वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार २३ मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता होती. मात्र, तो आज अंदमानमध्ये दाखल झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published.