Home » माझी वडवणी » प्रा. रवी गोरे सेट परिक्षेत उत्तीर्ण.

प्रा. रवी गोरे सेट परिक्षेत उत्तीर्ण.

प्रा. रवी गोरे सेट परिक्षेत उत्तीर्ण
डोंगरचा राजा / आँनलाईन
– धारुर तालुक्यातील धुनकवाड येथील प्रा.रवी बंकटराव गोरे हे सेट परिक्षेत उत्तीर्ण झाले आहेत .
28जानेवारी 2018रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेल्या सेट परिक्षेत केमिकल सायन्स या विषयात परिक्षा घेण्यात आली होती तरी या सेट परिक्षेचा निकाल काल लागला व चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत .यांचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले आसुन त्यांनी एम. एस .सी बीएड डाँ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पुर्ण केले आसुन सध्या अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यानी हे यश संपादन केले आसुन धुनकवाडकरांची मान उंचावली आहे. धुनकवाड येथील हा पहीला सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्याचा मान यांना मिळाला आहे .त्यांच्या यशाबद्ल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.